---Advertisement---

ऑस्ट्रेलिया-बांगलादेश सामन्यात घडला इतिहास; विश्वचषकात पहिल्यांदाच झाले असे

---Advertisement---

नॉटिंगहॅम। गुरुवारी(20 जून) आयसीसी 2019 विश्वचषकात 26 वा सामना बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. ट्रेंट ब्रिज मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 48 धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर या सामन्यात एक विश्वविक्रमही रचला गेला आहे.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 381 धावा केल्या होत्या. यानंतर 50 षटकात विजयासाठी 382 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशने शेवटपर्यंत चांगली लढत दिली होती. पण त्यांना 50 षटकात 8 बाद 333 धावाच करता आल्या.

या दोन्ही संघांनी 300 पेक्षाही मोठ्या धावसंख्या पार केल्याने या सामन्यात एकूण 714 धावा झाल्या. त्यामुळे विश्वचषकाच्या इतिहासात एका सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून 700 पेक्षा अधिक धावा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे विश्वचषकात एका सामन्यात सर्वोच्च धावा होण्याचा विक्रमही या सामन्यात झाला आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरने 166 धावांची शतकी खेळी, तर ऍरॉन फिंच(53) आणि उस्मान ख्वाजाने(89) अर्धशतकी खेळी केली. बांगलादेशकडून गोलंदाजीत सौम्य सरकारने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मुस्तफिजूर रेहमानने 1 विकेट घेतली.

बांगलादेशकडून मुशफिकूर रहिमने 102 धावांची नाबाद शतकी खेळी केली. तर तमीम इक्बाल(62) आणि महमुद्दलाहने(69) अर्धशतकी खेळी केल्या. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि नॅथन कुल्टर नाईलने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तसेच ऍडम झम्पाने 1 विकेट घेतली.

विश्वचषक इतिहासात एका सामन्यात झालेल्या सर्वोच्च धावा –

714 धावा – ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, नॉटींगहॅम, 2019

688 धावा – ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, सिडनी, 2015

682 धावा – इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, नॉटींगहॅम, 2019

676 धावा – भारत विरुद्ध इंग्लंड, बंगळूरु, 2011

671 धावा – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2007

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

युवराज सिंग आता खेळणार या स्पर्धेत!

बांगलादेश विरुद्ध शतकी खेळी करत डेव्हि़ड वॉर्नरने केली किंग कोहलीच्या विक्रमाची बरोबरी

भारतीय संघाला पुन्हा धक्का, बुमराहच्या यॉर्करमुळे हा खेळाडू झाला दुखापतग्रस्त

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment