कसोटी क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी पदार्पणात धमाकेदार कामगिरी केली आहे. कुणी शतकी, कुणी द्विशतकी खेळी तर कुणी पदार्पणातच ५ विकेट्स घेतल्या आहे.
कारकिर्दीतील पहिलाच कसोटी सामना भारतात भारताविरुद्ध खेळताना शतकी खेळी करणे तशी सोप्पी गोष्ट नक्कीच नाही. अगदी भारत दौऱ्यावर आलेल्या अनुभवी खेळाडूलाही येथे भारतीय फिरकीपटूंचा सामना करताना नाकीनऊ येते.
भारतीय जमिनीवर कसोटी कारकिर्दीतील पहिला सामना खेळलेले एकूण ३२० खेळाडू आहेत. यातील १४७ खेळाडू हे परदेशी खेळाडू आहेत. या १४७ खेळाडूंपैकी केवळ ८ खेळाडूंना भारतात पदार्पणातच शतक करता आले आहे.
कसोटी पदार्पणात भारतात शतक करणाऱ्या खेळाडूंपैकी ५ खेळाडूंची कारकिर्द पुढे अतिशय चांगली राहिली आहे. सर गाॅर्डन ग्रिनीज यांनी भारतात १९७४ला बेंगलुरु कसोटीत पदार्पण केले. त्यांनी पहिल्या डावात १०७ तर दुसऱ्या डावात ९३ धावा केल्या. त्यांना भारतात पदार्पणातच दोन्ही डावात शतकी खेळी करण्याचा विक्रम करण्याची मोठी संधी चालुन आली होती.
पदार्पणात ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्कने बेंगलुरु कसोटीत १५१ धावांची खेळी केली होती. ही भारतात पदार्पणात केलेली सर्वोत्तम खेळी आहे.
भारतात कसोटी पदार्पणात शतक करणारे परदेशी खेळाडू
१५१- मायकेल क्लार्क, ऑस्ट्रेलिया, बेंगलुरु कसोटी, २००४
१३६- ब्रायन वॅलेंटाईन, इंग्लंड, मुंबई कसोटी, १९३३
१३१- केन विलीयमसन, न्यूझीलंड, अहमदाबाद कसोटी, २०१०
११२- किटन जेनिंग्ज, इंग्लंड, मुंबई कसोटी, २०१६
१०७- सर गाॅर्डन ग्रिनीज, वेस्ट इंडिज, बेंगलुरु कसोटी, १९७४
१०५- ब्रुस टेलर, न्यूझीलंड, कोलकाता कसोटी, १९६५
१०४*- सर एलिस्टर कूक, नागपुर कसोटी, २००६
१००- एल्विरो पीटरसन, कोलकाता कसोटी, २०१०
ट्रेंडिंग घडामोडी –
एका संघाला विश्वचषक जिंकून दिलेला प्रशिक्षक होणार बडोद्याचा महागुरु