---Advertisement---

टाॅस का बाॅस- जो रुटचा टाॅस जिंकण्यात अजब कारनामा

---Advertisement---

कोलंबो | इंग्लंड  विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या कसोटी सामन्यात आज जो रुटने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. याबरोबर त्याच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.

कसोटीत सलग ८ किंवा अधिक वेळा नाणेफेक जिंकणारा तो जगातील ६वा कर्णधार ठरला आहे. केवळ काॅलीन क्वाॅड्रेने ९ वेळा कसोटीत नाणेफेक जिंकली आहे.

रुटने भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत ५ वेळा नाणेफेक जिंकली होती तर या दौऱ्यातही त्याने ३ पैकी ३ कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकली आहे.

विशेष म्हणजे या दोन्ही दौऱ्यात नाणेफेक खूपच महत्त्वाची ठरली. सध्या सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment