भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभूत झाला. त्यामुळे आता भारतीय संघाची विश्वचषक ट्रॉफीची प्रतीक्षा तब्बल 4 वर्षांनी वाढली आहे. भारतीय संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली यावेळी मजबूत संघ होता. कदाचित रोहित पुढील विश्वचषकात दिसणार नाही, पण विश्वचषक 2027 हंगामापर्यंत या संघातील कमीत कमी 8 खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकू शकतात. पुढील विश्वचषक 2027चे आयोजन दक्षिण आफ्रिका, झिम्ब्बावे आणि नामीबिया करणार आहेत.
आणखी 4 वर्षांनंतर किती असेल भारतीय खेळाडूंचे वय?
ज्या 8 खेळाडूंबाबत आपण जाणून घेणार आहोत, त्यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे. हे खेळाडू विश्वचषक 2027 (World Cup 2023) हंगामात खेळू न शकण्यामागील सर्वात मोठे कारण त्यांचे वय असू शकते. या खेळाडूंचे वय जवळपास 40च्या आसपास असेल. यापैकी एक खेळाडू चाळिशीही पार करेल. चला तर, पुढील विश्वचषकात कदाचितच दिसतील अशा खेळाडूंविषयी जाणून घेऊयात…
कोण आहेत ते खेळाडू?
विश्वचषक 2027पर्यंत चाळिशीपर्यंत पोहोचणाऱ्या खेळाडूंमध्ये आर अश्विन, रोहित शर्मा, विराट कोहली, रींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, केएल राहुल यांचा समावेश आहे. 2011 आणि 2015नंतर आता 2023चा विश्वचषक खेळणारा अश्विन पुढील विश्वचषकात भारताचा भाग असणे कठीण आहे. कारण, तो सध्या 37 वर्षांचा आहे. तसेच, पुढील विश्वचषकापर्यंत त्याचे वय 41 होईल.
याव्यतिरिक्त सध्या 36 वर्षांचा असलेला रोहित शर्मा पुढील विश्वचषकापर्यंत 40 वर्षांचा होईल. तसेच, विराट कोहली (Virat Kohli) याचे सध्याचे वय 35 आहे. विराटची सर्वात मोठी ताकद त्याचा फिटनेस आहे. मागील वर्षी टी20 विश्वचषकापासून विराट चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ते पाहता असे दिसते की, विराट सहजपणे पुढील विश्वचषक खेळू शकतो. मात्र, तो पुढील विश्वचषकापर्यंत 39 वर्षांचा होईल. अशात त्याचा फिटनेस ठरवेल की, विराट पुढील विश्वचषक खेळेल की नाही.
विश्वचषक 2027 स्पर्धेपर्यंत चाळिशीच्या आसपास पोहोचणाऱ्या भारतीय खेळाडूंमधील चौथे नाव रवींद्र जडेजाचे आहे. जडेजा सध्या 34 वर्षांचा आहे. तो पुढील विश्वचषकापर्यंत 38 वर्षांचा असेल. तसेच, सूर्यकुमार यादव आपल्या पहिल्याच विश्वचषकात फ्लॉप ठरला. त्याच्यासाठी पुढील वनडे विश्वचषक खेळणे कठीण आहे. तोपर्यंत त्याचे वय 37 होईल. वयानुसार, त्याचे पुढील विश्वचषक खेळणे कठीण आहेच, पण त्यासोबतच त्याचा वर्तमानातील वनडे क्रिकेटमधील फॉर्म पाहता तो पुढील विश्वचषकाच्या संघातूनही बाहेर पडल्याचे बोलले जात आहे. मात्र, सूर्या टी20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे.
https://twitter.com/seervibharath/status/1727278754295361558?s=46&t=eVYPf5A7lugQdoL3E8Xbiw
यादीतील अखेरची तीन नावे मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि केएल राहुल ही आहेत. शमी पुढील विश्वचषकापर्यंत 37 वर्षांचा होईल. फिटनेसचा विचार करता, त्याचे पुढील विश्वचषकात खेळणे कठीण आहे. तसेच, शार्दुलही पुढील विश्वचषकापर्यंत 36 वर्षांचा होईल. शार्दुलने या विश्वचषकात 3 सामने खेळले होते. त्यात त्याला फक्त 2 विकेट्स घेता आल्या होत्या. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याचेदेखील पुढील विश्वचषकात खेळणे कठीण आहे. तो पुढील विश्वचषकापर्यंत 36 वर्षांचा होईल. (8 indian players including rohit Sharma and Virat kohli will not be seen in the 2027 world cup see list)
हेही वाचा-
‘नासाच्या शास्त्रज्ञांनी सेट केला रोनाल्डोचा डायट’, रमीज राजाचा कहर शोध व्हायरल
BREAKING: वर्ल्डकप संपताच ICCने उचललं मोठं पाऊल, माजी वर्ल्ड चॅम्पियनवर घातली 6 वर्षांची बंदी






