---Advertisement---

भारीच! बॅटने नव्हे तर स्टंपने ‘मिस्टर ३६०’ प्रमाणे चौफेर फटकेबाजी करतोय हा ८ वर्षीय चिमुकला, पाहा व्हिडिओ

On: शनिवार, मे 15, 2021 1:38 PM
---Advertisement---

भारत हा क्रिकेटवेडा देश आहे. या देशात अगदी लहानांपासून जेष्ठ नागरिकांपर्यत क्रिकेटप्रेमी आढळून येतात. त्यामुळे अनेकदा अगदी लहानग्या चिमुकल्यांचे क्रिकेट खेळतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच एका ८ वर्षाच्या चिमुकल्याचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा लहान मुलगा चेन्नईमधील रहिवासी आहे. तसेच तो स्टंपने फलंदाजी करत आहे.

या मुलाचा व्हिडिओ इएसपीएन क्रिकइन्फोने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की ८ वर्षांच्या एवढ्या कमी वयात देखील हा लहान मुलगा अनेक क्रिकेटिंग शॉट्स सहजतेने खेळत आहे. तो बॅट ऐवजी स्टंपने चौफेर फटकेबाजी करताना ड्राईव्ह, स्वीप, स्कूप, फ्लिक शॉट मारत आहे. एवढेच नाही तर व्हिडिओच्या अखेरीस तो भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीप्रमाणे हेलिकॉप्टर शॉटही खेळत आहे. हेलिकॉप्टर शॉट हा धोनीचा ट्रेडमार्क शॉट आहे.

या लहान मुलाच्या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. तसेच तो चौफेर फटकेबाजी करत असल्याने त्याची ‘मिस्टर ३६०’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिविलियर्ससह देखील तुलना केली जात आहे.

सोशल मीडियावर लहान मुलाचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या गुणवंत मुलांचे क्रिकेट खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच त्यांच्यातील प्रतिभा पाहून त्यांच्या मदतीसाठी अनेक लोक पुढेही येत असतात.

केरळमधील लहानग्याचा व्हिडिओही झाला होता व्हायरल
काहीदिवसांपूर्वीच ९ वर्षीय मुलाचा स्टंपने फलंदाजी करतानाचाच व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हा मुलगा ड्राईव्ह, स्वीप, स्कूप, फ्लिक असे काही शॉट्स स्टंपने शानदारपणे खेळत असल्याचे दिसत होता. तो सिमेंटच्या खेळपट्टीवर सराव करत होता.

https://twitter.com/gradecricketer/status/1390831420663160832

मल्याळम मनोरमाने दिलेल्या वृत्तानुसार हा लहान मुलगा केरळचा रहिवासी असून राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने संघाच्या अधिकाऱ्यांना त्याचा व्हिडिओ पाठवला होता. त्यानंतर राजस्थान रॉयल्स त्या मुलाचा खर्च उचलण्यास तयार आहे. म्हणजेच राजस्थान रॉयल्स संघ या मुलाला स्पॉन्सर करेल.

महत्त्वाच्या बातम्या –

रमणला घरचा रस्ता तर पोवार प्रशिक्षकपदी, गांगुलीला सणसणीत पत्र लिहत केले ‘गंभीर आरोप’; होणार मोठा वाद!

‘जास्तीच बोट ऋतिककडे आहे, पण काड्या..’ विराटवर निशाणा साधणाऱ्या वॉनला भारतीय दिग्गजाची सणसणीत चपराक

सध्याचा खराब फॉर्म अन् इंग्लंडमधील चिंताजनक आकडेवारी, रहाणेला WTC Finalमध्ये जागा मिळणार का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---