एडलेड | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा ४३ धावांवर बाद झाला. यामुळे सद्यस्थितीत भारतीय संघाची १८ षटकांत २ बाद १०२ अशी अवस्था आहे.
परंतु बाद होण्यापुर्वी रोहितने एक खास कारनामा केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा पराक्रम त्याने केला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५३ आंतरराष्ट्रीय सामन्यात ८९ षटकार मारण्याचा पराक्रम केला.
यापुर्वी हा विक्रम ख्रीस गेलच्या नावावर होता. त्याने इंग्लंडच्या विरुद्ध ८८ षटकार मारले होते. तिसऱ्या स्थानावरील शाहिद आफ्रिदीने ८६ षटकार श्रीलंका संघाविरुद्ध मारले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
–जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजाला केले अफलातून धावबाद, पहा व्हिडिओ
–एमएम धोनीसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा वनडे या कारणासाठी आहे खास
–मोहम्मद सिराजचे झाले टीम इंडियाकडून वनडे पदार्पण