ऍडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज(15 जानेवारी) दुसरा वनडे सामना ऍडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली आहे.
त्यांचे सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंच(6) आणि ऍलेक्स कॅरे(18) हे स्वस्तात माघारी परतले. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्शने ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली होती. पण भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने ख्वाजाला धावबाद करत ही जोडी तोडली.
ख्वाजाने 19 व्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजी करत असताना तिसऱ्या चेंडूवर कव्हर पॉइंटच्या दिशेने फटका मारला आणि एक धाव काढण्याचा प्रयत्न केला. पण पॉइंटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या जडेजाने चपळाईने चेंडू आडवत नॉन स्ट्रायकर एन्डला फेकला. तो चेंडू थेट स्टम्पवर आदळला आणि ख्वाजा 21 धावा करुन बाद झाला.
यावर पंचानी थर्ड अंपायरची मदत मागितली होती. त्यावेळी रिव्ह्यूमध्ये ख्वाजा क्रिजच्या बाहेर असल्याचे दिसून आले. त्यामुळे ख्वाजाला बाद देण्यात आले.
This is a grouse piece of fielding.#AUSvIND | @bet365_aus pic.twitter.com/FyxkFy62Pg
— cricket.com.au (@cricketcomau) January 15, 2019
या सामन्यात ख्वाजा बाद झाल्यानंतर काही वेळातच पीटर हँड्सकॉम्बलाही जडेजाने बाद करत ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. हँड्सकॉम्बला धोनीने यष्टीचीत केले.
महत्त्वाच्या बातम्या –
–एमएम धोनीसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा वनडे या कारणासाठी आहे खास
–मोहम्मद सिराजचे झाले टीम इंडियाकडून वनडे पदार्पण
–अँडी मरे – टेनिसचा शापित शिलेदार