IPLक्रिकेटटॉप बातम्या

“डोळ्यात अश्रू अन् सर्व काही थांबलं होतं…”, धोनीनं कर्णधारपद सोडलं तेव्हा चेन्नईच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण कसं होतं?

महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद सोडताच केवळ चाहत्यांनाच नाही तर अनेक दिग्गजांनाही आश्चर्याचा धक्का बसला. सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीनं कर्णधारपद सोडल्यानंतर सांगितलं की, “आम्हाला हे आधीच माहित होतं. आम्ही नवीन लीडर तयार करत आहोत. भविष्य डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेणं गरजेचं होते.” प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी, धोनीनं जेव्हा संघातील उर्वरित खेळाडूंसमोर कर्णधारपद सोडण्याबाबत घोषणा केली, त्यावेळेसचा क्षण सांगितला.

फ्लेमिंग म्हणाले, “धोनीच्या डोळ्यात अश्रू होते. सर्व काही थांबलं होतं. ड्रेसिंग रूममध्ये खूप भावना, खूप अश्रू होते. ड्रेसिंग रूममधील सर्वांचे डोळे पाणावले होते. प्रत्येक जण भावूक झाला होता.” फ्लेमिंग पुढे म्हणाले की, “या भावनिक क्षणानंतर सर्वांनी ऋतुराजचं अभिनंदन केलं. धोनीचा हा भक्कम वारसा पुढे नेण्यात ऋतुराज यशस्वी होईल, अशी आम्हाला पूर्ण आशा आहे. धोनीनं आधीही कर्णधारपद सोडलं होतं, त्यावेळी आम्ही तयार नव्हतो. मात्र यावेळी आम्हाला या गोष्टी आधीच माहित होत्या.”

2022 मध्ये धोनीनं पहिल्यांदा चेन्नईचं कर्णधारपद सोडलं. तेव्हा त्याच्या जागी रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आलं होतं. मात्र जडेजा कर्णधार म्हणून यशस्वी ठरला नाही. त्यानंतर हंगामाच्या मध्यावर धोनीनं पुन्हा कर्णधारपद स्वीकारलं. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई 2023 साली पुन्हा चॅम्पियन बनली. माहीनं सीएसकेला 5 वेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलंय. आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई या मोसमात कशी कामगिरी करेल? कर्णधारपद सोडल्यानंतर धोनी या हंगामातील प्रत्येक सामन्यात खेळाडू म्हणून खेळणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असेल.

आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. या दोन संघांमध्ये आतापर्यंत आयपीएलचे एकूण 31 सामने खेळले गेले, ज्यामध्ये चेन्नईनं 20 सामने जिंकले तर बंगळुरूनं 10 सामने जिंकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

कोण आहे ऋतुराज गायकवाडची पत्नी उत्कर्षा पवार? क्रिकेटमध्ये कमावलंय मोठं नाव

चेन्नईचं कर्णधारपद सोडल्यानंतर काय आहे धोनीचा भविष्यातील प्लॅन? ऋतुराजकडे नेतृत्व का दिलं?

“मोहम्मद शमी माझी हत्या करू शकतो”, पत्नी हसीन जहाँचे गंभीर आरोप

Related Articles