---Advertisement---

‘या’ 9 खेळाडूंची लॉटरी! कोणाचे प्रमोशन, तर कोणाला पहिल्यांदाच मिळाला करार! पहा यादी

---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी (21 एप्रिल) दीर्घ प्रतीक्षेनंतर 2024-25च्या वार्षिक करारासाठी खेळाडूंची नावे जाहीर केली. गेल्या हंगामाचा करार गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात संपला. अशा परिस्थितीत, बीसीसीआयने खेळाडूंची नावे जाहीर करण्यासाठी बराच वेळ घेतला. एकूणच, बोर्डाने यावेळी 34 खेळाडूंना करार दिले आहेत. ग्रेड ए+ खेळाडूंची स्थिती (वार्षिक 7 कोटी रुपये) तशीच आहे, तर काही खेळाडूंना बढती देखील देण्यात आली आहे. म्हणजे, काही जण पहिल्यांदाच करारात सामील झाले आहेत, तर काहींच्या श्रेणीतही बदल झाला आहे.

हा करार (1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025) दरम्यान लागू राहील. बीसीसीआयने आधिकृत अकाऊंटवरुन याची महिती दिली आहे. या केद्रिंंय करारत एकूण 34 खेळाडूंचा समावेश आहे. ज्यापैकी 4 खेळाडूंनी ए+ ग्रेडमध्ये सामील करण्यात आला आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.

प्रमोशन किंवा पहिल्यांदाच करार मिळवणारे खेळाडू-

1) रिषभ पंत (‘ब’ वरून अ मध्ये)
2) श्रेयस अय्यर (ब मध्ये थेट प्रवेश, गेल्या वेळी बाहेर होता)
3) ईशान किशन (‘क’ श्रेणीत प्रवेश)
4) सरफराज खान (पहिल्यांदा ‘सी’ करार)
5) नितीश कुमार रेड्डी (पहिल्यांदा ‘क’ करार)
6) अभिषेक शर्मा (‘सी’ मधील पहिली नोंद)
7) आकाश दीप (पहिला ‘क’ करार)
8) वरुण चक्रवर्ती (पहिल्यांदा ‘क’ करार)
9) हर्षित राणा (पहिल्यांदा ‘सी’ करार)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---