मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद 8 धावा केल्या आहेत. तसेच भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला आहे.
या सामन्यात भारताकडून चेतेश्वर पुजाराने शतक तर मयंक अगरवाल, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अर्धशतके केली आहेत. मात्र या सामन्यात अजिंक्य रहाणेला मोठी खेळी करण्यात अपयश आले.
त्याला 34 धावांवर असताना ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने 149 व्या षटकात पायचीत बाद केले. रहाणेला कसोटीमध्ये बाद करण्याची लायनची ही 9 वी वेळ आहे. त्यामुळे रहाणे कसोटीमध्ये लायनच्या गोलंदाजीवर सर्वाधिक वेळा बाद होणारा फलंदाज ठरला आहे.
तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चालू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतच रहाणे पाच डावात तीन वेळा लायनच्याच गोलंदाजीवर बाद झाला आहे.
रहाणे पाठोपाठ लायनने चेतेश्वर पुजारा आणि अॅलिस्टर कूकला कसोटीमध्ये 8 वेळा बाद केले आहे. तर भारताचा कर्णधार कोहलीला 7 वेळा बाद केले आहे.
तसेच लायन हा मायदेशात भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत कसोटीत भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये 47 विकेट्स घेतल्या आहेत.
नॅथन लायनच्या गोलंदाजीवर सर्वाधिक वेळा बाद होणारे भारतीय फलंदाज –
9 वेळा – अजिंक्य रहाणे
8 वेळा – चेतेश्वर पुजारा
7 वेळा – विराट कोहली
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: हिटमॅन रोहित शर्माने ती गोष्ट केली तर ऑस्ट्रेलियन कर्णधार होणार मुंबई इंडीयन्सचा सपोर्टर
–तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचे ११ पैकी ६ खेळाडू आहेत त्रिशतकवीर
–कसोटीत गोलंदाजाने केवळ १५ चेंडूत घेतल्या ६ विकेट्स