कतार येथे सुरू असलेल्या 22व्या फिफा फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी (22 नोव्हेंबर) अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया असा सामना खेळला गेला. या सामन्यात विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असलेल्या अर्जेंटिना संघाला सौदी अरेबियाने 2-1 असे पराभूत करत खळबळ उडवून दिली. सौदी अरेबियाच्या या विजयाने त्यांचे सरकार भलतेच खूष झाले असून प्रत्येक खेळाडूंना मोठी भेटवस्तू देण्याची घोषणा केली आहे.
या मोठ्या विजयामुळे सौदी अरेबियामध्ये सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सरकारी सुट्टी जाहीर केली. तेथिल सरकार एवढ्यावरच थांबले नाही, ते आता प्रत्येक खेळाडूला मोठी भेटवस्तू देणार आहेत. सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलाम अल सउद यांनी कार देण्याची घोषणा केली आहे.
मोहम्मद बिन सलाम अल सउद यांनी सर्व खेळाडूंना रोल्स रॉयस फॅंटम कार देण्याची घोषणा केली आहे. भारतात रॉल्स रॉयस गाडीची किंमत 8.99 कोटी रुपयांपासून सुरू होते ते 10.48 कोटी रुपयांपर्यंत जाते. या विजयामुळे सौदी अरेबियाने अर्जेंटिनाच्या लागोपाठ 36 सामने जिंकण्याच्या सत्राला थांबवले. जागतिक क्रमवारीत 51व्या स्थानावर असलेल्या अरेबिया संघासाठी हा विजय खूपच महत्वाचा मानला जात आहे.
अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया सामन्यात लियोनल मेस्सीने गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती, मात्र दुसऱ्याच सत्रात सौदी अरेबियाने जबरदस्त पुनरागमन केले. सामन्याच्या 48व्या सालेह अल शेहरीने आणि 53व्या मिनिटाला सालेम अल डावसरीने गोल केले आणि अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का दिला.
Instantly iconic 🇸🇦#FIFAWorldCup | #Qatar2022 pic.twitter.com/8LXbwt4VNO
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 22, 2022
या सामन्यात अर्जेंटिना संघाने मैदानावर वर्चस्व गाजवले. तब्बल 70 टक्के चेंडू त्यांच्या ताब्यात होता. तर, त्यांनी तब्बल 15 शॉट्स व 6 शॉट ऑन टारगेट लगावले. मात्र, महत्त्वाचे दोन गुण सौदी अरेबियाने मारले. या पराभवामुळे अर्जेंटिनाचे स्पर्धेतील आव्हान आता धोक्यात आले आहे. पुढील दोन्ही सामन्यात त्यांना विजय मिळवावे लागतील. FIFA World Cup 2022: Saudi Arabia players to get a Rolls-Royce each for defeating Argentina
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबाद एफसी आणि एटीके मोहन बागान पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नशील
जणू लाईफ लाईन परतली… ! स्टेडियमवर पुन्हा परतल्याने एफसी गोवा संघाचे फॅन्स आनंदी