पुणे : येथे सुरु असलेल्या फादर शॉक स्मृती आंतरशालेय हॉकी स्पर्धेत तिसऱ्या दिवशी सेंट जोसेफ आणि लॉयला प्रशाला संघांनी दणदणीत विजयासह आपली छाप पाडली. स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात तब्बल तीस गोलची नोंद झाली. मुलांच्या १७ वर्षांखालील गटात सेंट जोसेफने मध्यंतराच्या १०-० अशा आघाडीनंतर ज्योती इंग्लिश प्रशाला संघाचा १९-० असा पराभव केला.
सेंट जोसेफकडून अजिंक्य ननावरेने पाच, तर विपुल खांडेकरने चार गोल करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. सक्षम हुलेने तीन, वेदांत हुलेने दोन, तर अफान मुल्ला, अयान सय्यद, पियुष चौधरी, गोविद अहिर, प्रांजय गवळी यांनी एकेक गोल केला.
१४ वर्षांखालील गटात लॉयला प्रशाला संघाने अनय शिंदेने नोंदविलेल्या चार गोलसह एमसीईएस प्रशाला संघाचा ६-० असा पराभव केला. आयुष नलावडेने अन्य दोन गोल केले.
निकाल –
१४ वर्षांखालील गट अ – ज्योती इंग्लिश स्कूल ३ (सौरव ठाकूर १४वे, हुसेन कर्नाची ३१वे, आदित्य आढाव ४८वे मिनिट) वि.वि. एमसीईएस इंग्लिश फ्रशाला ० मध्यंतर १-०
गट ब सेंट जोसेफ मुलांची प्रशाला २ (ध्रुव शहा ३८वे, आर्य यादव ३६वे मिनिट) वि.वि. पीसीएमसी ० मध्यंतर १-०
गट अ लॉयला प्रशाला ६ (अनय शिंदे ८, ३८, ४०. ५८वे मिनिट, आयुष नलावडे २५, ४९वे मिनिट) वि.वि. एमसीईएस ० मध्यंतर २-०
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजयानंतर सूर्याने स्वतः सांगितले वादळी खेळीमागचे कारण, काय म्हणाला जाणून घ्याच
बॅटिंगला उतरण्याआधी ईशान किशनने केला मोठा घोळ, पंतला मैदानाबाहेर पाहावी लागली वाट