नागपूर। श्री राजेंद्र हायस्कूल संघाने नागपूर टप्यात १४ वर्षांखालील मुलांच्या गटाचे जेतेपद पटकावले आणि मुंबईत होणाऱ्या प्ले ऑफचे तिकीट पक्के केले. अंतिम सामन्यात त्यांनी सेंटर पॉईंट स्कूलवर ५ विकेट्स राखून विजय मिळवला. श्री चौधरीने अष्टपैलू कामगिरी करताना संघाला जेतेपद पटकावून दिले.
रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात सेंटर पॉईंट स्कूल संघाला ३७.५ षटकांत सर्वबाद १५० धावा करता आल्या. श्री चौधरीने ४ विकेट्स घेत सेंटर पॉईंट संघाच्या डावाला भगदाड पाडले. श्री राजेंद्र हायस्कूल संघाने हे लक्ष्य ३९.४ षटकांत ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. श्री चौधरीने ९५ चेंडूंत ५३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यश गुप्ताने २४ धावा केल्या. अर्धशतक आणि ४ विकेट्स घेणाऱ्या श्री चौधरीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
१४ वर्षांखालील मुले (अंतिम सामना)
श्री राजेंद्र हायस्कूल ३९.४ षटकांत ५ बाद १५१ ( श्री चौधरी ५३, यश गुप्ता २४) वि. वि. सेंटर पॉईंट स्कूल ( दभा) ३७.५ षटकांत सर्वबाद १५०; ५ विकेट्स राखून विजयी; सामनावीर – श्री चौधरी ( ९५ चेंडूंत ५३ धावा आणि ४ विकेट्स).