पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग २०२० स्पर्धेत सेबर्स, कुकरीज संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित अनोख्या व नाविन्यपूर्ण अशा पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत सेबर्स व कुकरीज या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात कुकरीज संघाने लॅन्सर्स संघाचा १४-०९ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. बॅडमिंटन प्रकारात अतुल बिनीवाले, तन्मय चोभे, अनिश राणे, तेजस चितळे, अमोद प्रधान, केदार नाडगोंडे, चिन्मय चिरपुटकर, देवेंद्र राठी, अतुल ठोंबरे, तन्मय चितळे यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर कुकरीज संघाने लॅन्सर्स संघाचा ५-३ असा पराभव करून संघाला विजयी सुरुवात करून दिली. त्यांनतर टेबल टेनिसमध्ये कुकरीज संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत लॅन्सर्स संघाचा ६-२ असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. पण अखेरच्या टेनिस प्रकारात कुकरीज संघाला लॅन्सर्स संघाकडून ३-४ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, कुकरीज संघाने आपली आघाडी कायम राखत लॅन्सर्स संघावर १४-०९ अशा फरकाने विजय मिळवला.

दुसऱ्या सामन्यात सेबर्स संघाने किर्रपन्स संघाचा १३-१० असा पराभव करून सलग दुसऱ्या विजयासह उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत सेबर्स संघाचा सामना एक्सकॅलिबर्स संघाशी, तर कुकरीज संघाचा सामना किर्रपन्स संघाशी होणार आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

कुकरीज वि.वि.लॅन्सर्स १४-०९

बॅडमिंटन: कुकरीज वि.वि.लॅन्सर्स ५-३(अतुल बिनीवाले/तन्मय चोभे वि.वि.अमर श्रॉफ/अमोल मेहेंदळे ३०-१५; अनिश राणे/तेजस चितळे वि.वि.प्रथम वाणी/तेजस किंजवडेकर ३०-२८; अमोद प्रधान/केदार नाडगोंडे वि.वि.आलोक तेलंग/राजशेखर करमरकर ३०-१४; कपिल बाफना/मनीष शहा पराभूत वि. अभिजित राजवाडे/आनंद घाटे १७-३०; चिन्मय चिरपुटकर/देवेंद्र राठी वि.वि.पार्थ केळकर/सुदर्शन बिहाणी ३०-१८; निखिल चितळे/प्रांजली नाडगोंडे पराभूत वि.अनिल आगाशे/जयकांत वैद्य २४-३०; क्षितिज कोतवाल/मधुरा टेंबे पराभूत वि.नितीन सरदेसाई/राहूल मुथा १७-३०; अतुल ठोंबरे/तन्मय चितळे वि.वि.गौरी कुलकर्णी/सिद्धार्थ मराठे ३०-२०);

टेबल टेनिस: कुकरीज वि.वि.लॅन्सर्स ६-२(तन्मय चितळे/सचिन बेलगलकर वि.वि.तेजस किंजवडेकर/सारंग देवी ३०-२१; अतुल बिनीवाले/किरण गर्गे पराभूत वि.आशिष बोडस/शिल्पा पांडे २०-३०; अतुल ठोंबरे/केदार नाडगोंडे वि.वि.आनंद घाटे/अभिजित राजवाडे ३०-२४; तन्मय चोभे/अनिश राणे वि.वि.नितीन सरदेसाई/अमित महाजनी ३०-२०; राहुल गांगल/मनीष शहा वि.वि.किया तेलंग/अनिल आगाशे ३०-१८; निखिल चितळे/क्षितिज कोतवाल वि.वि.राहुल मुथा/आलोक तेलंग ३०-२०; अमोद प्रधान/गौरव भगत वि.वि.प्रथम वाणी/सन्मय तेलंग ३०-१४; कपिल त्रिमल/अद्विक नाटेकर पराभूत वि.सिद्धार्थ मराठे/सुदर्शन बिहाणी २१-३०);

टेनिस: कुकरीज पराभूत वि.लॅन्सर्स ३-४(गौरव भगत/अभिजित गानू पराभूत वि.सारंग देवी/अभिजित मराठे २४-३०; तन्मय चितळे/राहुल गांगल पराभूत वि.सिद्धार्थ मराठे/राहुल मुथा १८-३०; रिया चाफेकर/केदार नाडगोंडे पराभूत वि.अमित महाजनी/नितीन सरदेसाई १८-३०; अद्वैत नाटेकर/तन्मय चोभे वि.वि.तेजस किंजवडेकर/सन्मय तेलंग ३०-२५; क्षितिज कोतवाल/मधुरा टेंबे पराभूत वि.चारूदत्त साठे/शरयू राव १७-२०; आदित पाबळकर/अतुल बिनीवाले वि.वि.आलोक तेलंग/अमोल मेहेंदळे २०-१४; प्रांजली नाडगोंडे/अनिश राणे वि.वि.आनंद घाटे/सुदर्शन बिहाणी २०-१२);

सेबर्स वि.वि.किर्रपन्स १३-१०

बॅडमिंटन: सेबर्स वि.वि.किर्रपन्स ५-३(९ईशान तळवळकर/विनीत रुकारी वि.वि.संग्राम पाटील/सुमेध शहा ३०-२९; अनिकेत दामले/विक्रांत पाटील वि.वि.देवेंद्र चितळे/रणजित पांडे ३०-२१; संजय फेरवानी/विक्रम ओगले पराभूत वि.शताक्षी किणीकर/श्रीदत्त शानबाग १४-३०; अनिकेत सहस्रबुद्धे/अनिष रुईकर वि.वि.मकरंद चितळे/सचिन अभ्यंकर ३०-२९; नीरज दांडेकर/प्रतीक वांगीकर वि.वि.कुणाल भुरट/नंदन डोंगरे ३०-१५; प्रियदर्शन डुंबरे/रघुनंदन बेहेरे वि.वि.समीक्षा एरंडे/सोहन वर्तक ३०-२२; अभिषेक व्यास/अवनी गोसावी पराभूत वि.आरुषी पांडे/अनया तुळपुळे ०७-३०; आनंदिता गोडबोले/रोनित मुथा पराभूत वि.समीर जोशी/शिरीष साठे १४-३०);

टेबल टेनिस: सेबर्स पराभूत वि.किर्रपन्स ३-५(विक्रांत पाटील/जयंत महाबोले पराभूत वि.रणजित पांडे/सुमेध शहा २१-३०; अतुल्य वाजपेयाम/कौस्तुभ देशपांडे वि.वि.देवेंद्र चितळे/श्रीदत्त शानबाग ३०-२०; सार्थक प्रधान/अभिषेक व्यास पराभूत वि.कुणाल भुरट/नितीन पेंडसे १२-३०; विनीत रुकारी/ईशान तळवळकर पराभूत वि.अजय जाधव/संतोष भिडे१५-३०; सौरभ चिंचणकर/विक्रम ओगले पराभूत वि.मकरंद चितळे/संग्राम पाटील १८-३०; रघुनंदन बेहरे/अंकित दामले वि.वि.रोहन जमेनीस/अभय जमेनिस ३०-२२; प्रियदर्शन डुंबरे/प्रतीक वांगीकर वि.वि.अमित धर्मा/अभिजित मुनोत ३०-२७; अवणी गोसावी/रोनित मुथा पराभूत वि.शमीक्षा एरंडे/सुविद नाडकर्णी १६-३०);

टेनिस: सेबर्स वि.वि.किर्रपन्स ५-२(राजू कांगो/प्रतीक वांगीकर पराभूत वि.रणजित पांडे/रोहन जमेनीस २७-३०; अवनी गोसावी/रघुनंदन बेहरे वि.वि.अभय जमेनीस/अजय जाधव ३०-२२; हनीफ मेमन/सार्थक प्रधान पराभूत वि.देवेंद्र चितळे/सरगम पाटील २५-३०; प्रियदर्शन डुंबरे/अभिषेक व्यास वि.वि.सचिन अभ्यंकर/शिरीष साठे ३०-२७; नरेंद्र बापट/सौरभ चिंचणकर वि.वि.कुणाल भुरट/अभिजित मुथा २०-१२; ईशान तळवळकर/रोनित मुथा वि.वि.आकाश भिलारे/समीर जोशी २०-१८; अंकित दामले/विक्रांत पाटील वि.वि.मकरंद चितळे/सुमेध शहा २०-१६).

You might also like