भारताच्या इतर खेळाडूंपेक्षा भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आपल्या फिटनेसबाबात नेहमीच सजग असतो. त्याने फिटनेसबाबत आधुनिक क्रिकेटमध्ये बेंचमार्क स्थापित केले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने खूप विक्रम केले आहेत, तसेच तो कर्णधार असताना भारताने अनेक विजय मिळवले आहेत. एक कर्णधार आणि फलंदाज म्हणून विराटने भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. दरम्यान भारतीय संघाचे माजी फिजियो आशीष कौशिक (Aashish Kaushik) यांनी विराट कोहलीच्या फिटनेसबाबात मोठा खुलासा केला आहे.
विराट कोहलीने नुकताच भारतीय कसोटी कर्णधारपदाचा राजिनामा दिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसी विश्वचषक २०१९ मध्ये उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. तसेच त्याने आपल्या कर्णधारपदाखाली भारतीय कसोटी संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या हंगामात अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले होते.
तसेच तो २०११ सालच्या विश्वविजेत्या भारतीय संघाचाही भाग होता. या विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यासंदर्भातील एक उलगडा करत माजी फिजियो आशीष कौशिक यांनी सांगितले की, विराट कोहलीमध्ये वेदना सहन करण्याची अद्भुत क्षमता आहे. २०११ च्या विश्वचषकादरम्यान आशीष कौशिक भारतीय संघासोबत होते.
हेही वाचा- ‘गुरू’ धोनीकडून धडे घेत आयपीएल २०२२ गाजवण्यास हंगारगेकर सज्ज! नेट्समध्ये करतोय सराव
कौशिक यांनी सांगितले की, “विराट कोहलीमध्ये वेदना सहन करण्याची भरपूर क्षमता आहे. काही खेळाडू वेदनांमधून स्वत:ला प्रभावित करत असतात. परंतु कोहली या सर्वांपेक्षा वेगळा आहे. मला आठवते की, २०११ च्या विश्वचषकावेळी त्याला मानेत वेदना होत होत्या. मोहालीमध्ये विश्वचषकाचा उपांत्य फेरीचा सामना खेळला जाणार होता, परंतु त्याने वेदना सहन करत हा सामना खेळला होता.”
विश्वचषक २०११ मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन संघांंमध्ये मोहाली येथे उपांत्य फेरी सामना सामना खेळला गेला होता. या सामन्यात विराट वेदना सहन करत उतरला होता, तो ९ धावा करुन बाद झाला. भारताने महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली या सामन्यात पाकिस्तानला २९ धावांनी पराभूत केले होते. नंतर श्रीलंकेविरुद्धचा अंतिम सामना जिंकत विश्वचषक सुद्धा आपल्या नावावर केला होता.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, “एक खेळाडू आपली तुलना दुसऱ्या खेळाडूसोबत करू शकतो. परंतु विराट हे असे व्यक्तिमत्व आहे, जो स्वत:ची तुलना जगातील सर्वश्रेष्ठ एथलीट्ससोबत देखील करण्यास तयार होता. कधी कधी आपल्याला समजत नाही की त्या वेदना किंवा दुखापती किती मोठी आहे, तुम्ही काहीतरी मोठे मिळवण्यासाठी तयार असता.”
महत्त्वाच्या बातम्या
वाॅर्नचे खांदे कसे बनले मजबूत?, अश्विनने सांगितली द्रविडकडून ऐकलेली बालपणीची कहाणी
वेस्ट इंडिजच्या क्रिकेटरचा हवेत सूर मारत एकहाती झेल, विश्वचषकातील ठरला सर्वोत्तम कॅच!
वेस्ट इंडिजने ७ धावांनी इंग्लंडचा उडवला धुव्वा, नोंदवला विश्वचषकातील सलग दुसरा विजय