श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान गॉल येथे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी खेळली जात आहे. पहिल्या दिवशी पाकिस्तानने यजमान श्रीलंकेला २२२ धावांवर सर्वबाद करत पहिला दिवस गाजवलेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने पाकिस्तानची अवस्था दयनीय केली. मात्र, पाकिस्तानचा कर्णधार व प्रमुख फलंदाज बाबर आझमने शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्याचबरोबर त्याने मोठा पराक्रम केला.
श्रीलंकेला पहिला डावात २२२ धावांवर रोखल्यानंतर पाकिस्तानची अवस्था ७ बाद १०७ अशी झालेली. मात्र, कर्णधार बाबर आझमने संघाला संकटातून बाहेर काढत अप्रतिम शतक झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक ठरले. या डावातील ३४ वी धाव काढताच बाबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान १०,००० धावा काढणारा आशियाई फलंदाज बनला. त्याने विराट कोहलीला मागे सोडले. विराटने केवळ २३२ गावांमध्ये ही कामगिरी केली होती. त्यापूर्वी पाकिस्तानचेच माजी कर्णधार जावेद मियादाद यांनी २४८ डावांत ही कामगिरी करून दाखवलेली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला गेल्यास सर्वात वेगवान १०,००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अनेक मोठी नावे सामील आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर विवियन रिचर्ड्स यांनी केवळ २०६ डावात हा पल्ला गाठलेला. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला २१७ डाव, वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा २२० डाव व इंग्लंडचा जो रूट २२२ डावांसह पहिल्या चार क्रमांकावर काबीज आहेत.
पाकिस्तानची सामन्यात वापसी
श्रीलंकेला २२२ धावांवर रोखल्यानंतर पाकिस्तानची अवस्था दयनीय झाली होती. आपला दुसरा सामना खेळणाऱ्या प्रभात जयसूर्याने पाच बळी घेत पाकिस्तानला ७ बाद १०७ अशा स्थितीत आणून ठेवले होते. मात्र, त्यानंतर बाबरने शतक ठोकून संघाला २०० पार घेऊन जाण्यात यश मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या
तब्बल ९७ वर्षानंतर कसोटीमध्ये झाली पुनरावृत्ती, श्रीलंकेच्या गोलंदाजाचा धूमाकुळ कायम
शेवटच्या निर्णायक वनडे सामन्यात नशीब भारताच्या बाजूने, नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय
ENG vs IND | निर्णायक सामन्यात जसप्रीत बुमराहला दिलेली विश्रांती भारताला भोवणार ?