भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील आणि सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना सध्या ओल्ड ट्रॅफर्ड म्हणजेच मँचेस्टरच्या मैदानावर खेळवला जात आहे. सध्या या मालिकेत दोन्ही संघ १-१च्या बरोबरीवर आहेत. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवत दोन्ही संघांना मालिका खिशात घालायची आहे. अशी या महत्वाच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानाविषयी बोलायचे झाले तर रोहित शर्मा व्यतिरिक्त एकही भारतीय फलंदाज इथे वनडेमध्ये शतक झळकावू शकलेला नाही. त्याने ३ सामन्यात ५३ च्या सरासरीने १५९ धावा केल्या आहेत. १४० धावांची सर्वोत्तम खेळी. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतकही झळकावले होते.
माजी कर्णधार विराट कोहलीही येथे ३ सामन्यात दिसला आहे आणि त्याने २ अर्धशतकांच्या मदतीने १५० धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५० आहे आणि त्याने ७७ धावांची सर्वोत्तम खेळी खेळली आहे. मैदानावर भारतीय धावा करण्याच्या बाबतीत रोहित आणि कोहली नंबर-१ आणि नंबर-२ वर आहेत.
असे आहेत दोन्हीही संघ-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा
इंग्लंड: जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, रीस टोप्ले
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘तुमसे ना हो पायेगा!’ शेवटच्या चेंडूवर फ्री हिट मिळूनही बलाढ्य संघाने गमावला सामना
टीम इंडियाचे ‘हे’ स्टार खेळाडू वेतन घेणार ७ कोटी, खेळणार मात्र २१ टक्केच
विराटला समर्थन देणाऱ्या पीटरसनच्या पोस्टखाली अनुष्काचा रिप्लाय, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘एकदम कडक!’