---Advertisement---

‘तुमसे ना हो पायेगा!’ शेवटच्या चेंडूवर फ्री हिट मिळूनही बलाढ्य संघाने गमावला सामना

On: रविवार, जुलै 17, 2022 2:07 PM
T20-Blast-Trophy
---Advertisement---

शनिवारी (१६ जुलै) इंग्लंमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० ब्लास्टचा अंतिम सामना खेळला गेला. हॅम्पशायरने आणि लंकाशायर यांच्यात हा सामना खेळला गेला असून हॅम्पशायरने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. हॅम्पशायरचा वेगवान गोलंदाज नाथन एलिसने शेवटच्या चेंडूवर फलंदाजाला त्रिफळाचीत केले होते, पण पंचांनी अंतिम क्षणी तो नो बॉल असल्याचे सांगितले आणि हा चेंडू पुन्हा टाकला गेला. आता लंकाशायरला विजयासाठी विजयासाठी एका चेंडूत ३ धावा हव्या होत्या, पण त्यांना त्या करता आल्या नाहीत.

लंकाशायरला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर ५ धावा करायच्या होत्या. वेगावन गोलंदाज नाथन एलिस (Nathan Ellis) याने शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली होती, पण नो बॉल असल्यामुळे ती विकेट मिळाली नाही. शेवटच्या चेंडूवर फलंदाज रिचर्ड ग्लीसन त्रिफलाचीत झाल्यानंतर हॅम्पशायर संघाचे खेळाडू  ट्रॉफी जिंकल्याच्या आनंदात जल्लोष करत होते. पण पंचांनी त्यांच्या आनंदावर पाणी फेरले. शेवटचा चेंडू दोन वेळा टाकावा लागला, पण खेळाडूंना टी-२० ब्लास्टची ट्रॉफी दोन वेळा जिंकण्याचा आनंदही घेतला. शेवटच्या चेंडूवर ३ धावा हव्या होत्या, पण लंकाशायरच्या फलंदाजाने फक्त एक धाव घेतली आणि हॅम्पशायरने एका धावेने विजय मिळवला.

हॅम्पशायरचा कर्णधार जेम्स विंसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजाचा निर्णय घेतला. मर्यादित २० षटकांमध्ये हॅम्पशायरने ८ विकेट्सच्या नुकसानावर १५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात लंकाशायरने ८ विकेट्सच्या नुकसानावर १५१ धावा केल्या. लंकाशायरला शेवटच्या षटकात एकूण ११ धावांची आवश्यकता होती. पण त्यांनी दोन धावा कमी केल्या. परिणामी संघाला पराभव स्वीकारावा लागला.

हॅम्पशायचा सलामीवीर फलंदाज बेन मॅक्डरमॉटने अवघ्या ३६ चेंडूत ६२ धावा केल्या. या धावा त्याने ४ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने केल्या. या जबरदस्त फलंदाजीसाठी मॅक्डरमॉटला सामना संपल्यानंतर सामनावीर निवडले गेले. तर दुसरीकडे लंकाशायरसाठी मॅट पार्किंसनने अप्रतिम गोलंदाजी करून दाखवली. त्याने टाकलेल्या ४ षटकांमध्ये २६ धावा दिल्या आणि सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---