बुधवारी (६ ऑक्टोबर) शेख झायेद स्टेडियमवर आयपीएल २०२१ चा ५२ वा सामना पार पडला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत खेळला गेला असून हैदराबादने यामध्ये अवघ्या ४ धावा राखून विजय मिळवला आहे. फलंदाजी करताना हैदराबाद संघाने १४१ धावा केल्या आणि आरसीबीसमोर सोपे आव्हान ठेवले होते. असे असले तरीही त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर हैदराबादने सामन्यात विजय मिळवला आहे. दरम्यान आरसीबीचा ग्लेन मॅक्सवेल चांगल्या लयीत असताना केन विलियम्सनने डायरेक्ट हिट करून त्याला धावबाद केले.
आरसीबीला हैदराबादने दिलेले लक्ष्य गाठता आले नाही, यामध्ये एक महत्वाची भूमिका हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सननेही पार पाडली आहे. आरसीबीच्या फलंदाजीवेळी १५ वे षटक हैदराबादचा राशिद खान गोलंदीजी करत होता. खेळपट्टीवर आरसीबीचा देवदत्त पडिक्कल आणि ग्लेन मॅक्सवेल फलंदाजी करत होते. राशिद खानच्या षटकाच्या पहिला चेंडू देवदत्त पडिक्कलने खेळला आणि त्यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. पडिक्कल धाव घेण्यासाठी पुढे आल्यावर मॅक्सवेलही त्याला नकार देऊ शकला नाही आणि धावत सुटला.
धाव घेण्यासाठी धावल्यानंतर ३० यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेला केन विलियम्सनने चपळाई दाखवली आणि चेंडू एक हाताने पकडून स्टंपच्या दिशेने डायरेक्ट थ्रो केला. केन विलियम्सनने मारलेला डायरेक्ट हिट मॅक्सवेल स्ट्राईकवर पोहचण्याआधी योग्य निशाण्यावर लागला. परिणामी मॅक्सवेलला पवेलियनमध्ये परतावे लागले. सामन्यात एकवेळ अशी होती की, आरसीबी सामना जिंकेल असे वाटत होते. पण विलियम्सनच्या डायरेक्ट हिटमुळे मॅक्सवेल बाद झाल्यानंतर सामन्याचे चित्र पालटले आणि शेवटी हैदराबादने सामन्यात विजय मिळवला.
https://twitter.com/rishobpuant/status/1445801107582697474?s=20
दरम्यान, सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम हैदराबादला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १४१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबी २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर १३७ धावा करू शकला आणि संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
डोळ्यात पाते लवते न लवते इतक्यात डॅनियलचा ‘रॉकेट कॅच’, फलंदाजांच्याही उंचावल्या भुवया- VIDEO
सीएसकेच्या ताफ्यात रोहित शर्माच्या भिडूची एन्ट्री, घेणार दुखापग्रस्त सॅमची जागा; वाचा त्याच्याबद्दल
अवघ्या दुसऱ्या सामन्यात ‘काश्मिरी बॉय’ने रचला इतिहास, बनला आयपीएल २०२१चा ‘नवा स्पीडस्टार’