भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ज्यात 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये उभय संघांमधील 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या महिला निवड समितीने 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघाची कमान हरमनप्रीत कौरच्या हाती असेल तर स्मृती मानधना उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. यास्तिका भाटिया आणि रिचा घोष या दोन यष्टीरक्षकांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
5 डिसेंबरपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर दुसरा सामना 8 डिसेंबरला तर मालिकेतील शेवटचा सामना 11डिसेंबरला होणार आहे. पहिले दोन एकदिवसीय सामने ब्रिस्बेनमधील ॲलन बॉर्डर फील्डवर खेळवले जातील, त्यानंतर मालिकेतील अंतिम सामना पर्थमधील वाका (WACA) मैदानावर खेळवला जाईल. जो आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग आहे. अलीकडेच टीम इंडियाने न्यूझीलंडला मायदेशात वनडे मालिकेत 2-1 ने पराभूत केले होते आणि आता ऑस्ट्रेलियाला त्याच्याच घरच्या मैदानावर पराभूत करण्याकडे लक्ष असेल. मात्र, टीम इंडियासाठी हे काम इतकं सोपं नसेल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिला वनडे: 5 डिसेंबर, ब्रिस्बेन
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरा वनडे: 8 डिसेंबर, ब्रिस्बेन
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरा वनडे: 11 डिसेंबर, पर्थ
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा , मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तीतास साधू, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, सायमा ठाकूर.
हेही वाचा-
पाकिस्तान संघाच्या नावावर मोठा कलंक, टी20 सामने हरण्यात प्रथम क्रमांक
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचे गोलंदाजी खूपच कमकुवत! ऑस्ट्रेलियन बाॅलर खूपच पुढे
आरसीबीची मोठी चूक? कारकिर्दीत एकच विकेट घेणारा खेळाडू बनला गोलंदाजी प्रशिक्षक