भारतीय संघाचा माजी फलंदाज व चेन्नई सुपर किंग्सचा प्रमुख खेळाडू सुरेश रैना हा सध्या अनेक कारणांनी चर्चेत आहे. रैनाने स्वतः एक पुस्तक लिहिले असून, यामध्ये त्याने आपल्या कारकीर्दीतील अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आढळून आला. यासोबतच चेन्नई सुपर किंग्सच्या इंस्टाग्राम खात्यावरून चाहत्यांशी झालेल्या संवादात त्याने आपल्या जीवनावर आधारित चित्रपटात म्हणजेच बायोपिकमध्ये कोणी प्रमुख भूमिका निभवावी, याचा उल्लेख केला आहे.
रैनाने लिहीले पुस्तक
आपल्या क्रिकेट कारकिर्दीत आक्रमक फलंदाजीने सर्वांची मने जिंकणाऱ्या रैनाने नुकतेच ‘बिलीव्ह: व्हॉट लाईफ ऍण्ड क्रिकेट टफ मी’ हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकामध्ये त्याने भारतीय संघासोबत घडलेल्या आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. या पुस्तकाला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळताना दिसतेय.
या अभिनेत्यांनी करावे बायोपिकमध्ये काम
चेन्नई सुपर किंग्सच्या इंस्टाग्राम पेजवरून चाहत्यांशी संवाद साधला. त्यामध्ये एका चाहत्याने त्याला ‘तुझ्या बायोपिकमध्ये तुझी भूमिका कोणी करावी?’, हा प्रश्न विचारला. त्यावर रैनाने कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्याचे नाव न घेता दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेते सूर्या व दुल्कर सलमान यांचे नाव घेतले.
त्याने यामागे कारण देताना म्हटले, “मी दक्षिण भारतीय कलाकारांचे नाव सुचवण्यामागे माझ्या चेन्नई कनेक्शनचे कारण आहे. मी असाच अभिनेत्याचे नाव सांगेल जो देश आणि चेन्नईशी असलेले माझे नाते पडद्यावर उत्कृष्टरित्या साकारू शकेल.”
https://www.instagram.com/p/CQi5i7YAPKa/
यापूर्वी भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन व एमएस धोनी यांच्या जीवनावर चित्रपट बनले आहेत. ज्यामध्ये इम्रान हाश्मी या अभिनेत्याने अझरूद्दीन यांची तर, दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने धोनीची भूमिका साकारली होती. भारताला १९८३ क्रिकेट विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांच्या आयुष्यावर बनत असलेल्या चित्रपटात रणवीर सिंग प्रमुख भूमिका निभावत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“भारतीय चाहत्यांमध्ये खेळभावनेची कमतरता” विश्वविजेत्या खेळाडूने उपटले भारतीय क्रिकेटप्रेमींचे कान
क्रिकेटर नसता तर ‘हा’ भारतीय खेळाडू सॉफ्टवेअर इंजिनिअर असता
“कोहलीमध्ये दिसते रिचर्ड्स आणि पॉन्टिंगची झलक, असे खेळाडू दशकातून एकदाच भेटतात”