भारताचा मध्यमगती गोलंदाज एस श्रीसंतने (S Sreesanth) तो आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचा(Chennai Super Kings) तिरस्कार(Hate) करत असल्याचे म्हटले आहे. त्याने राजस्तानचे माजी प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी केलेल्या आरोपांना चूकीचे असल्याचे म्हणत चेन्नई सुपर किंग्सचा(सीएसके) तिरस्कार करण्यामागचे कारणही स्पष्ट केले आहे.
अप्टन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटले आहे की जेव्हा श्रीसंतचा चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यासाठी अंतिम 11 जणांच्या संघात समावेश केला नव्हता तेव्हा श्रीसंतने त्यांच्याशी अयोग्य वर्तण केले होते.
या आरोपाबद्दल इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत श्रीसंतने म्हटले आहे त्याने कधीही अप्टन यांच्या वाईट वर्तण केले नाही.
श्रीसंत म्हणाला, ‘मिस्टर अप्टन तूमच्या हृदयावर हात ठेवून आणि तूमच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगा की मी आयपीएल दरम्यान तूमच्याशी कधी गैरवर्तण केले? मी दिग्गज राहुल द्रविडला पण विचारू इच्छितो मी त्यांच्याशी कधी भांडलो? मी अप्टन यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे त्यांच्याशी कधी गैरवर्तण केले?’
‘मी अप्टन यांना तो सामना मला खेळू द्या म्हणून खूपदा विनंती केली होती. ही विनंती मी केवळ सीएकेबरोबर(CSK) असणारा माझा इतिहास होता आणि मला त्यांना पराभूत करायचे होते. पण अप्टन यांनी मला फिक्सिंगसाठी हा सामना खेळायचा होता, असे म्हणत याला वेगळेच वळण दिले.’
‘सर्वांना माहित आहे मी सीएसकेचा किती तिरस्कार करतो, मला याबद्दल काही सांगायची गरज नाही. लोकांना वाटते मी एमएस धोनी किंवा एन श्रीनिवासन यांच्यामुळे सीएसकेचा तिरस्कार करतो, पण हे सत्य नाही. मी फक्त पिवळ्या रंगाचा तिरस्कार करतो. मी ऑस्ट्रेलियाचाही याच कारणासाठी तिरस्कार करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी सीएकेविरुद्ध चांगली कामगिरी केली होती म्हणून मला खेळायचे होते.’
तसेच अप्टन यांचे आरोप निराशाजनक होते, त्याचा अजूनही त्रास होतो. असेही श्रीसंतने म्हटले आहे.
सध्या श्रीसंतवर 2013 मध्ये झालेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेट खेळण्यास बंदी आहे. त्याच्यावरील ही बंदी पुढीलवर्षी सप्टेंबरमध्ये उठणार आहे. या प्रकरणाबद्दल बोलताना श्रीसंतने म्हटले आहे की ‘मी माझ्या मुलांची, माझ्या आई-वडीलांची शपथ घेऊन सांगतो मी असे(स्पॉट फिक्सिंग) काहीही केलेले नाही. मी 100 कोटींसाठीही असे करणार नाही’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–२०१८-१९ च्या विजेत्या मुंबईला छत्तीसगडचा दे धक्का!
–एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल शिखर धवनने केले मोठे भाष्य…
–ब्लॉग: प्रो कबड्डीतले ‘ओल्ड हॉर्सेस’