क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताचे दोन संघ एकावेळी दोन वेगवेगळे दौरे करत आहे. एक भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. तर दुसरा भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंकामध्ये मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. तत्पुर्वी इंग्लंड दौऱ्यावर असलेला युवा सलामीवीर शुबमन गिल गंभीर दुखापतग्रस्त झाल्याने संपूर्ण कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत गिलच्या जागी दुसऱ्या कोणत्या खेळाडूला घेतले जाईल? हे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयचे निवडकर्ता बघत आहेत. याच बाबतीत निवडकर्त्यांकडून काही संकेत मिळाले आहेत.
टाइम्स ऑफ इंडियातील वृत्तानुसार, जर संघाचे व्यवस्थापन भारतीय संघाच्या निवडकर्त्यांशी गिलच्या बदली खेळाडूविषयी बोलले तर निवडकर्ते पृथ्वी शॉला श्रीलंकेच्या दौर्यानंतर इंग्लंडला पाठवू शकतात. पण मालिकेपूर्वी पृथ्वी शॉला इंग्लंडला पाठवले तर तिथे त्याला विलगिकरणाचे नियम पाळावे लागणार आहेत. त्यामुळे त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये स्थान मिळणार नाही. पृथ्वी शॉ श्रीलंकेहून ब्रिटनला रवाना होईल आणि तिथे कोरोना प्रोटोकॉलचे पालन केल्यानंतर तिसर्या कसोटी सामन्यात तो उपलब्ध होईल.
भारतीय संघाचा श्रीलंका दौरा 25 जुलै रोजी होणाऱ्या शेवटच्या टी20 सामन्याने संपणार आहे. त्याचबरोबर भारताला इंग्लंडविरुद्ध 4 ऑगस्टपासून एक कसोटी मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत जर पृथ्वी शॉ श्रीलंकेहून इंग्लंडला किंवा भारताहून इंग्लंडसाठी उड्डाण भरत असेल तर त्याला क्वारंटाईनमध्ये राहावे लागणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर सराव सत्रांमध्येही सहभागी व्हावे लागेल.
त्यानंतर तिथून भारतीय संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करावे लागेल आणि निवडीसाठी उपलब्ध राहावे लागेल. इंग्लंडमध्ये शुबमन गिलची जागा घेण्यासाठी सध्या मयंक अगरवाल आणि केएल राहुलसारखे खेळाडू देखील आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल की शुबमन गिलची जागा नक्की कोण घेईल?
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा सगळ्या टीम इंडियाला सोडलं, पण हरभजन सिंगला मात्र न्यूझीलंडच्या विमानतळावर पकडलं
ओहो! एका बोटावर बॅट बॅलन्स करण्याच्या आवाहनात अनुष्काची विराटला काट्याची टक्कर, Video व्हायरल
क्वारंटाईन संपवून ‘टीम धवन’ सरावासाठी उतरली मैदानात, फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ