इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड लीगमध्ये खेळाडूंचा धमाका पाहायला मिळत आहे. कधी फलंदाजी, कधी गोलंदाजी तर कधी क्षेत्ररक्षणाने खेळाडू प्रभावित करताना दिसत आहेत. अशात सोमवारी (१५ ऑगस्ट) इंग्लंडच्या २९ वर्षीय फलंदाज लियाम लिविंगस्टोन याने झंझावाती प्रदर्शन सर्वांना आपले कौतुक करण्यास भाग पाडले आहे. लिविंगस्टोनने १६० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना संघाला विजय मिळवून दिला आहे.
सोमवारी द हंड्रेडमध्ये (The Hundred) बर्मिंघम फिनिक्स विरुद्ध ट्रेंट रॉकेट्स (Birmingham Phoenix vs Trent Rockets) संघांचा आमना सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ट्रेंट संघाने १०० चेंडूत १४५ धावा केल्या. ट्रेंट संघाच्या १४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बर्मिंघम संघाकडून लिविंगस्टोनचा धमाका पाहायला मिळाला. या सामन्यात त्याने ३२ चेंडू खेळताना १५९.३८ च्या सरासरीने नाबाद ५१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४ षटकार निघाले आहेत. तसेच १ चौकारही ठोकला होता.
या खेळीदरम्यान लिविंगस्टोनने एका हाताने षटकार खेचत सर्वांची वाह वाह लुटली होती. आपला ४ पैकी एक षटकार त्याने फक्त डाव्या हाताने खेळला असून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्याने या षटकाराबरोबर त्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला विजयही मिळवून दिला. त्याच्या या षटकाराचा व्हिडिओ द हंड्रेड लीगने पोस्ट केला आहे.
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ट्रेंट रॉकेट्सने १०० चेंडूत ६ विकेट्सच्या नुकसानावर १४५ धावा केल्या. ट्रेंट संघाकडून डॅनियल सॅम्सने सर्वाधिक ५५ धावा केल्या. २५ चेंडू खेळताना ३ षटकार आणि ५ चौकार मारत त्याने नाबाद ५५ धावा केल्या होत्या. परंतु त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. या डावात इंग्लंडचा गोलंदाजी बेन्नी होवेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या.
One-handed six for the win and for 50? 🤯
Go on then, @liaml4893! #TheHundred pic.twitter.com/YslaAYodYh
— The Hundred (@thehundred) August 15, 2022
प्रत्युत्तरात बर्मिंघमकडून लिविंगस्टोन आणि मोईन अली यांनी दोघांनीही अर्धशतके केली. अलीने २८ चेंडूत ५२ धावा फटकावल्या. अशाप्रकारे मोईन आणि लिविंगस्टोनने मिळून ८६ चेंडूतच संघाला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO। चाहत्यांना पाहायला मिळाला युवीचा पुराना अंदाज, तुफानी फलंदाजी करत ठोकतोय षटकार
युएई लीगसाठी कोलकात्ता फ्रँचायझीने जाहिर केलाय संघ, वाचा कोणकोणत्या दिग्गजांचा समावेश
अल्टीमेट खो खो स्पर्धेत मुंबई खिलाडीज संघाने खाते उघडले, राजस्थान वॉरियर्सवर आठ गुणांनी मात