आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्स संघाची कामगिरी संमिश्र होताना दिसत आहे. पंजाबने आतापर्यंत दहा सामने खेळताना पाच गमावले असून, पाच सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे. पंजाबच्या यशात यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा याचे महत्त्वाचे योगदान राहिले. जितेश सातत्याने वेगवान फलंदाजी करत पंजाबला मोठी धावसंख्या उभारून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतोय. त्याच्या या कामगिरीनंतर पंजाबचे प्रशिक्षक व निवड समितीचे माजी सदस्य सुनील जोशी यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
मागील वर्षी जितेश याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे मन जिंकले होते. त्याने या हंगामात संघासाठी सर्वात निर्णायक भूमिका बजावली. त्याने जवळपास प्रत्येक सामन्यात आपल्या आक्रमक खेळाने पंजाबला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्याच्या या कामगिरीबद्दल बोलताना जोशी म्हणाले,
“जितेश जबरदस्त खेळत आहे. त्याने त्याचा दर्जा दाखवून दिला आणि त्यामुळे त्याला भारतीय संघात संधी मिळाली होती. मागील 18 महिन्याच्या काळात त्याने आयपीएल व देशांतर्गत क्रिकेटमध्ये जो काही खेळ दाखवला आहे, त्यामुळे तो इतर यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये सरस वाटतो.”
आयपीएल आधी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत त्याला संजू सॅमसन याच्या जागी भारतीय संघात स्थान मिळालेले. मात्र, अंतिम अकरामध्ये त्याला संधी मिळाली नाही. अन्य काही समीक्षकांनी देखील तो लवकरच भारतीय संघाचा प्रमुख सदस्य होऊ शकतो असे म्हटले.
जितेश याने आत्तापर्यंत आयपीएल 2023 मध्ये 10 सामने खेळताना 26.56 च्या सरासरीने 239 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 165 पेक्षा जास्त राहिला आहे. तसेच त्याच्या बॅटमधून 16 षटकारही आले आहेत.
(Former Selector Sunil Joshi Said Jitesh Sharma Ahead Other Wicketkeeper)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आधी वाद नंतर गळाभेट! सिराज-सॉल्टने दाखवली खिलाडूवृत्ती, सोशल मीडियावर होतंय कौतुक
“दिल्लीने विराटला आपल्या संघात घ्यावे”, दिग्गजाने घातली भावनिक साद