रोहित शर्मा सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. रोहितने शनिवारी (6 मे) चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात एकही धाव न करता विकेट गमावली. रोहित या सामन्यात खेळपट्टीवर आला आणि डावातील तिसऱ्याच चेंडूवर त्याने स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण रोहितचा हा प्रयत्न चुकल्याने रविंद्र जडेजाच्या हातात झेलबाद झाला. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावसकर यांनी रोहितला खडेबोल सुनावले आहेत.
रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघासाठी आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी नेहमीच डावाची सुरुवात करत आला आहे. पण चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शनिवारी चेपॉक स्टेडियवर त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. रोहितने तीन चेंडूत खेळून एकही धाव न करता रविंद्र जडेजाच्या हातात विकेट गमावली. वेगवान गोलंदाज दीपक चाहरला रोहितची विकेट मिळाली. रोहितने विकेट गमावली, तेव्हा संघाची धावसंख्या 2.5 षकात 3 बाद 14 धावा होती. आधीच दोन विकेट गेल्या असताना रोहितने स्कूप शॉट खेळून जोखीम घेण्याची गरज नव्हती, असे सुनली गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले.
गावसकर म्हणाले की, “सामना सुरू असल्यासारखे वाटतच नव्हते. मी पूर्णपणे चुकीचा असू शकतो. पण त्याने ज्या पद्धतीचा शॉट खेळला, तो एका कर्णधाराचा शॉट नव्हता. जेव्हा संघ अडचणीत असतो, तेव्हा कर्णधार डाव सांभाळत असतो. कर्णधाराला अशा परिस्थितीत एक चांगली खेळी खेळायची असते, जेणेकरून संघ एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचेल. पावरप्लेमध्ये दोन विकेट्स गेल्या होत्या आणि आपण फॉर्ममध्ये नाहीये. रोहित फॉर्ममध्ये असता, तर त्याचे स्कूप शॉट खेळणे समजू शकत होतो. पण मागच्या सामन्यात शुन्यावर बाद झालो असताना हा एक मोठा आणि जोखिमेचा शॉट आहे.”
गावसकरांच्या मते रोहितने हा स्कूप शॉट खेळण्याआधी खेळपट्टीवर सेट व्हायला पाहिजे होते. तो म्हणाले, “त्याने सर्वात आधी आपले खाते खोलले पाहिजे होते. पायाची हालचाल केली पाहिजे होती. वेगात एक किंवा दोन धावांसाठी प्रयत्न केला पाहिजे होता. त्यानंतर मोठे शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता. तो आधीपासून काहीतरी वेगळा विचार करून खेळपट्टीवर आला असू शकतो. एक झोटासा ब्रेक त्याच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, असे मला वाटते. पण हा त्याचा आणि मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाचा निर्णय असेल.”
दरम्यान, रोहित मागच्या चार आयपीएल डावांमध्ये 2, 3, 0, 0 असे प्रदर्शन करू शकला आहे. शनिवारी त्याच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद देखील झाली. रोहित आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत 16 वेळा अशी नकोशी कामगिरी केली आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामन्याचा विचार केला, तर चेपॉकवर सीएसकेकडून मुंबईला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. (Sunil Gavaskar scolds Rohit Sharma)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर आझमला नाही आवडत विराट कोहली! सांगितली मॉडर्न डे क्रिकेटमधील चार सर्वोत्तम नावे
आयपीएलमध्ये घडणार इतिहास! पंड्या ब्रदर्स करणार आपापल्या संघाचे नेतृत्व