आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत असलेला डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाने आपल्या खेळीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. यामध्ये सोमवार (19 एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याने 4 षटकांत 36 धावा देऊन 3 बळी घेतले. यामध्ये त्याने कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यासारख्या दिग्गजांचा समावेश होता. तरीसुद्धा त्याच्या संघाने 45 धावांनी सामना गमावला. परंतु सकारिया आपली छाप सोडण्यात यशस्वी झाला.
सामन्यानंतर त्याने धोनीची भेट घेतली आणि त्याच्यासोबत फोटोही काढला. इंस्टाग्रामवर स्वत:चा धोनीसोबतचा फोटो शेअर करत त्याखाली ‘मी लहानपणापासूनच तुम्हाला पसंत करत असून आज प्रत्यक्ष तुमच्याविरुद्ध सामना खेळण्याची संधी मिळाली. हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असून जीवनभर हा क्षण माझ्या लक्षात राहिल. तुमच्यासारखा दुसरे कोणीही असू शकत नाही. माझ्यासारख्या खेळाडूला प्रेरणा देण्यासाठी धन्यवाद.’ असे लिहले आहे.
https://www.instagram.com/p/CN28lPegA_p/?igshid=k0x51axisjmo
सीएसकेविरुद्ध तीन बळी घेण्यापूर्वी पंजाब किंग्ज विरुद्धही त्याने तीन बळी घेतले होते. यात मयंक अग्रवाल, केएल राहुल आणि झाय रिचर्डसन यांचा होता. त्याचा इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्षात्मक राहिला आहे. त्याचे वडील रिक्षाचालक होते. पण काही वर्षांपूर्वी त्यांचा अपघात झाल्याने यानंतर कुटुंबाची जबाबदारी चेतनवर आली. परंतु तो खचला नाही आपल्या कुटुंबाची देखभाल करत सतत क्रिकेट खेळत राहिला.
परंतु यावर्षी जानेवारी महिन्यात चेतन सय्यद मुश्ताक अली चषक खेळत असताना त्याच्या लहान भावाने आत्महत्या केली. मात्र तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत व्यस्त असल्याने घरातील लोकांनी त्याला काही याबद्दल कळवले नाही. घरी गेल्यानंतर त्याला त्याच्या भावाच्या आत्महत्येबाबत कळाले तेव्हा त्याला खूप दुःख झाले होते.
यंदाच्या आयपीएल लिलावात त्याची मूलभूत किंमत 20 लाख होती. परंतु त्याची घरेलू क्रिकेटमधील कारकीर्द पाहता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्सच्या चढाओढीत राजस्थानने त्याला 1.2 कोटी रुपयांत विकत घेतले. सध्या तो आयपीएलमध्ये राजस्थानकडून सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू ठरला आहे. त्याने तीन सामन्यांत 16.66 च्या सरासरीने एकूण 6 बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!
नाणं उचला अन् खिशात टाका, गल्ली क्रिकेटची सवय का अजून काही; बघा संजू सॅमसनने काय सांगितलं?
मिस्टर अँड मिसेस चहल मुंबईत दाखल, आकाशातून क्लिक केला मायनगरीचा नेत्रदिपक फोटो; तुम्हीही घ्या पाहून