गेल्या वर्षी दोन वेळा 140 कोटी भारतीयाचं हर्ट ब्रेक करणाऱ्या खेळाडूला ‘आयसीसी प्लेअर ऑफ द इयर 2023’ (वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू) पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. हा खेळाडू दुसरा-तिसरा कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आहे!
पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या संघानं गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. विशेष म्हणजे, या दोन्ही स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाचा पराभव केला होता.
टी20 विश्वचषकात शुक्रवारी (21 जून) अँटिग्वा येथे ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात सुपर-8 सामना झाला. या सामन्यापूर्वी पॅट कमिन्सला ‘सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी’नं सन्मानित करण्यात आलं. ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पाँटिंग यानं कमिन्सला ही ट्रॉफी दिली. ‘आयसीसी प्लेयर ऑफ द इयर’ या ट्रॉफीला सर गारफिल्ड सोबर्स यांचं नाव देण्यात आलंय. रिकी पाँटिंग यानं स्वतः दोनदा ही ट्रॉफी जिंकली आहे.
What a moment 😍
Australia legend Ricky Ponting hands the Sir Garfield Sobers trophy to Pat Cummins for winning the ICC Men’s Cricketer of the Year 2023 🏆 pic.twitter.com/AoQeK1Z5y1
— ICC (@ICC) June 21, 2024
पॅट कमिन्सनं प्रथमच आयसीसी प्लेयर ऑफ द इयर ट्रॉफी जिंकली आहे. आयसीसीनं 2004 मध्ये हा पुरस्कार सुरू केला होता. ही ट्रॉफी जिंकणारा राहुल द्रविड पहिला क्रिकेटपटू होता. आतापर्यंत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सर्वाधिक वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे. पॅट कमिन्सच्या आधी ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग, मायकेल क्लार्क, मिचेल जॉन्सन आणि स्टीव्ह स्मिथ यांची ‘आयसीसी प्लेयर ऑफ द इयर’ म्हणून निवड झाली आहे.
भारताच्या चार खेळाडूंनी ‘आयसीसी प्लेयर ऑफ द इयर’चा पुरस्कार पटकावला आहे. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, रविचंद्रन अश्विन आणि विराट कोहली हे ते 4 क्रिकेटपटू आहेत. विशेष म्हणजे, विराट कोहलीनं दोन वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे. याशिवाय विराट कोहलीला 2020 मध्ये ‘आयसीसी प्लेयर ऑफ द डिकेड’ (दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू) म्हणूनही निवडण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेट विश्वचषकात मिचेल स्टार्कचा दबदबा! या बाबतीत टाकलं सर्व दिग्गजांना मागे
विराट कोहलीचा विश्वविक्रम धोक्यात, सूर्यकुमार यादवनं अवघ्या 64 सामन्यांत रचला इतिहास!
टी20 विश्वचषक 2024 मधील पहिली हॅट्ट्रिक! ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामन्यात घडला इतिहास