१२ आणि १३ फेब्रुवारीला बँगलोरमध्ये आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव( IPL 2022 mega auction) पार पडणार आहे. या लिलावात एकूण ५९० भारतीय व विदेशी खेळाडूंचा समावेश असणार आहे. २०२२ च्या आयपीएल लिलावात दोन नव्या संघाना स्थान देण्यात आले आहे. लखनऊ आणि अहमदाबादला या दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे. लखनऊ संघाचा कर्णधार म्हणून भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल तर अहमदाबाद संघाचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याची निवड करण्यात आली आहे.
लखनऊ संघाचे नामकरण लखनऊ सुपर जायंट्स असे करण्यात आले आहे. केएल राहूलबरोबरच संघाने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनीस आणि फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई यांना सुद्धा संघाने विकत घेतले आहे.
लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायझीनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये केएल राहुलला पुष्पा चित्रपटातील शैलीत त्याचा लूक बनवला आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘केएल राहूल झुकणार नाही’.
https://www.instagram.com/p/CZtKk-AtmF0/?utm_source=ig_web_copy_link
हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून लोकांनी याच्यावर २७ हजारांहून अधिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. लखनऊ सुपर जायंट्स संघाने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओला ६२ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोवर प्रतिक्रिया देत एक चाहता म्हणाला की, ‘मग तो फलंदाजी कशी करणार.?’
केएल राहुलने आत्तापर्यंत पंजाब किंग्जकडून खेळताना कर्णधारपद सांभाळले आहे. पण त्याच्या नेतृत्वाखाली संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सुद्धा राहुलची कामगिरी निराशाजनक राहिली. जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या गैरहजरीत भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुलने केले. तेव्हा भारताला मालिका ०-३ ने गमवावी लागली.
रविवारपासून(६ फेब्रुवारी) भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु झाली आहे. या मालिकेत केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. पण पहिल्या सामन्यात तो खेळला नाही. हा सामना भारताने जिंकला. बुधवारी दुसऱ्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
भारतात विराटचा मोठा विश्वविक्रम; मास्टर-ब्लास्टर सचिनही पडला जवळपास ८०० धावांनी मागे
वेस्ट इंडिजच्या स्मिथचा भारताला दुहेरी धक्का, एकाच षटकात २ मोठ्या फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता