आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव (mega auction) आयोजित केला होता. मेगा लिलाव बेंगलोरमध्ये पार पडला. मेगा लिलावात अनेक दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. तर अनेक युवा खेळाडूंवरही मोठ्या बोल्या लागताना दिसल्या. मुंबई इंडियन्सने मेगा लिलावात काही महत्वाच्या खेळाडूंवर पैसा खर्च केला. महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (arjun tendulkar) यालाही मुंबई इंडियन्सने पुन्हा ताफ्यात सामील केले.
अर्जुन तेंडुलकरसाठी मुंबईला यावर्षी त्याच्या बेस प्राइसपेक्षा जास्त रक्कम खर्च करावी लागली. मुंबई इंडियन्सने त्याला ३० लाख रुपयांमध्ये खरेदी केले. त्याची बेस प्राइस २० लाख रुपये होती. गुजरात टायटन्सने अर्जुनला खरेदी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याची किंमत १० लाख रुपयांनी वाढली. मागच्या वर्षापेक्षा अर्जुनला ३३ टक्के रक्कम वाढून मिळाली आहे. मागच्या हंगामात मुंबईने त्याला बेस प्राइस २० लाखात खरेदी केले होते.
मागच्या आयपीएल लिलावात सर्वात शेवटी विकला गेलला खेळाडू म्हणजे अर्जुन तेंडुलकर होता. मुंबईने त्याच्यावर विश्वास दाखवत २० लाखाची बोली लावली होती. मागच्या वर्षी अर्जुन मुंबईच्या संघात सामील झाला असला, तरी स्पर्धेदरम्यान तो दुखापग्रस्त झाला. याच कारणास्तव त्याला आयपीएल पदार्पण करण्याची संधी मिळाली नव्हती. अशात यावर्षी त्याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळेल अशी शक्यता आहे.
दरम्यान, अर्जुन आगामी रणजी ट्रॉफीसाठीही संधी मिळाली आहे. तत्पूर्वी, मागच्या वर्षी त्याने सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. रणजी ट्रॉफीचा पुढचा हंगाम काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. मुंबई संघाकडून खेळताना अर्जुन यावर्षी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करेल अशी शक्यता आहे. रणजीतील त्याचे प्रदर्शन पाहून त्याच्या आयपीएल पदार्पणाविषयी मुंबई इंडियन्स विचार करेल.
महत्वाच्या बातम्या –
चमिका करुनारत्नेला केकेआरने दिले आश्रय, लावली इतक्या लाखांची बोली
न्यूझीलंडच्या २ बहिणी टीम इंडियावर पडल्या भारी, ६२ धावांनी पहिली वनडे जिंकत मालिकेचा केला शुभारंभ