---Advertisement---

राजस्थान रॉयल्समध्ये सामील होताच चहलने घेतला पंगा! वाचा सविस्तर

On: रविवार, फेब्रुवारी 13, 2022 11:17 PM
chahal-100
---Advertisement---

बेंगलोर येथे १२ आणि १३ फेब्रुवारीला आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव पार पडला. विराट कोहलीचा आवडता खेळाडू युझवेंद्र चहल या हंगामात राजस्थान राॅयल्स संघाकडून पहिल्यांदाच खेळाताना दिसणार आहे. राजस्थान राॅयल्स संघाने फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलला आयपीएल लिलावात ६.५० कोटी रुपयांना खरेदी केले आहे. याअगोदर तो आरसीबी संघासाठी खेळला आहे. राजस्थान संघात प्रवेश केल्यानंतर चहल आणि राजस्थान संघाच्या संभाषणाचा फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

युझवेंद्र चहलने आपली मुळ किंमत २ कोटी रुपये एवढी ठेवून तो लिलावात उतरला होता. चहलसोबतच अश्विन सुद्धा राजस्थान संघाकडून खेळताना दिसणार आहे. आर अश्विनला राजस्थानला ५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. चहल त्याच्या नव्या संघासोबत खेळण्यासाठी उत्सुक आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी राजस्थान राॅयल्स संघ आणि चहल यांच्यात ऑनलाइन संवाद झाला. त्याचा फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

राजस्थान राॅयल्स संघाने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटद्वारे एक स्क्रीनशाॅट शेअर केला आहे. त्यामध्ये चहल म्हणाला, कसे आहात तुम्ही सगळे. त्यावर फ्रॅंचायझी म्हणाले, खुप बरे आहोत. हळूहळू तुम्हाला कळेल. यानंतर युजवेंद्र चहलने म्हटलं की, ‘तुम्ही फॉलो करत नाहीय का? थोडं सांभाळून राहा. आम्हीही काही कमी नाही.’ चहलच्या या प्रश्नावर राजस्थानने म्हटलं की, ‘फॉलो तर तुम्हाला लहानपणापासून करतोय पण इन्स्टाग्रामवर आता सुरुवात झालीय’. यावर चहलने म्हटलं की, ‘आपली जोडी चांगली जमेल. आता भेटीची उत्सुकता आहे फक्त.’

https://www.instagram.com/p/CZ6c6lgP7Um/?utm_medium=copy_link

https://www.instagram.com/p/CZ50fiov_QZ/?utm_medium=copy_link

 

चहलने आतापर्यंत आयपीएलमधील ११४ सामने खेळले असून त्यामध्ये २२.२८ च्या सरासरीने आणि ७.५९ च्या इकॉनॉमी रेटने १३९ विकेट्स घेतल्या आहेत. पीयूष चावला आणि अमित मिश्रा यांच्यानंतर लीगमध्ये १०० पेक्षा जास्त बळी घेणारा तो तिसरा फिरकी गोलंदाज आहे. मागच्या हंगामात त्याने २०.७७ च्या सरासरीने १५ सामन्यात १८ बळी घेतले होते. गेल्या हंगामात तो आरसीबीकडून दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.

महत्वाच्या बातम्या-

न्यूझीलंडच्या २ बहिणी टीम इंडियावर पडल्या भारी, ६२ धावांनी पहिली वनडे जिंकत मालिकेचा केला शुभारंभ (mahasports.in)

अगग! बोल्टच्या रिप्लेसमेंटसाठी मुंबईने खर्च केले ८ कोटी, पण वेगवान गोलंदाज पूर्ण हंगाम असेल अनुपलब्ध? (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---