पाकिस्तान क्रिकेटचा सध्या सुवर्णकाळ सुरू आहे. यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. सुपर १२ फेरीतील सलग ३ सामन्यात विजय मिळवून पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा दावेदार बनला आहे. तसेच या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघाला पराभूत करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. यानंतर आता भारतीय संघाने आयसीसीने टी-२० क्रमवारीतही भारतीय संघाला धक्का दिला आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ टी२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानी होता. परंतु विश्वचषकातील सलग २ सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर पाकिस्तान संघाला याचा जबरदस्त फायदा झाला आहे. पाकिस्तान संघाने सलग ३ सामन्यात विजय मिळवत २६५ गुणांसह दुसरे स्थान गाठले आहे. तर २७९ गुणांसह इंग्लंड संघ पहिल्या स्थानी आहे आणि २६२ गुणांसह भारतीय संघ तिसऱ्या स्थानी आला आहे.
संघांच्या आयसीसी टी-२० क्रमवारी यादीत भारत पाकिस्ताननंतर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघ आहेत. न्यूझीलंड संघाचे २५७ गुण आहेत. तर दक्षिण आफ्रिका संघाचे २५० गुण आहे. तर सहाव्या स्थानी ऑस्ट्रेलिया, सातव्या स्थानी अफगानिस्तान, आठव्या स्थानी वेस्ट इंडिज, नवव्या स्थानी बांगलादेश आणि दहाव्या स्थानी श्रीलंका संघ आहे.
आयसीसी टी-२० रँकिंग (टॉप -१५ संघ)
१)इंग्लंड – २७९ रेटिंग
२)पाकिस्तान – २६५ रेटिंग
३)भारत – २६२ रेटिंग
४) न्यूझीलंड – २५७ रेटिंग
५)दक्षिण आफ्रिका – २५० रेटिंग
६)ऑस्ट्रेलिया – २४३ रेटिंग
७)अफगानिस्तान – २३५ रेटिंग
८)वेस्ट इंडिज – २३४ रेटिंग
९)बांगलादेश – २३४ रेटिंग
१०)श्रीलंका – २३० रेटिंग
११) झिम्बाब्वे – १९२ रेटिंग
१२) आयर्लंड -१८८ रेटिंग
१३) नेपाळ – १८७ रेटिंग
१४) स्कॉटलॅंड – १८७ रेटिंग
१५)नामिबिया – १७९ रेटिंग
महत्त्वाच्या बातम्या-
हाव इज द JOS! फलंदाजाचा अंदाज चुकला अन् क्षणभरात बटलरने यष्टीमागून उडवली दांडी
रोहित शर्मासह ‘हे’ ५ खेळाडू ठरले खेलरत्न पुरस्काराचे मानकरी; ईशांत, दिप्तीलाही अर्जुन पुरस्कार