भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) याला आगामी एकदिवसीय मालिकेसाठी संघात निवडले गेले आहे. तर, दुसरीकडे एकदिवसीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) दुखापतीमुळे आगामी मालिकेला मुकणार आहे. दरम्यान, एकदिवसीय संघासोबत दक्षिण अफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी सूर्यकुमार आणि रोहितची भेट झाली.
https://www.instagram.com/surya_14kumar/p/CYYm_ezL0lO/?utm_medium=copy_link
बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियवर सूर्यकुमार आणि रोहित यांची भेट झाली आहे. सूर्यकुमारने स्वतःच्या सोशल मीडिया खात्यावरून रोहितसोबतचो फोटो शेअर केला आहे. चाहते सूर्यकुमारच्या या पोस्टला मोठ्या प्रमाणात लाइक करत आहेत. आगामी एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा अनुपस्थितीत असल्यामुळे केएल राहुल भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
रोहित शर्माला मागच्या काही दिवसांपूर्वी भारतीय संघाच्या दोन मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या. टी२० विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडले होते आणि रोहित शर्माला ही जबाबदारी दिली गेली होती. त्यानंतर दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा करताना रोहितला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवले गेले होते. परंतु, एकदिवसीय संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच एकदिवसीय मालिकेत रोहित उपस्थित राहू शकणार नाही.
दक्षिण अफ्रिकेसाठी रवाना होण्यापूर्वी मुंबईत सराव करताना रोहितच्या पायाला दुखापत झाली होती आणि कसोटी मालिकेतून त्याने माघार घेतली होती. तो अद्याप दुखापतीमधून सावरला नसल्यामुळे आगामी एकदिवसीय मालिकेतून देखील त्याला माघार घ्यावी लागली. दक्षिण अफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. अशात भारताचा एकदिवसीय संघ लवकरच दक्षिण अफ्रिकेसाठी रवाना होईल.
दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी निवडला गेलेला भारताचा एकदिवसीय संघ –
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, रिषभ पंत, इशान किशन, युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या –
PHOTO: क्विंटन डी काॅक बनला बाप माणूस, नवजात परीचा नावासह शेअर केलाय फोटो
आयएसएल: ९ सामन्यानंतरही आहे विजयाची पाटी कोरी; एससी ईस्ट बंगालसमोर बलाढ्य मुंबई सिटी एफसीचे आव्हान
बुमराहशी वाद घातल्याने दिग्गजाने जेन्सनला खडसावले; करून दिली ‘त्या’ घटनेची आठवण
व्हिडिओ पाहा –