मुंबई । कोरोना या विषाणूने जगभर हाहाकार माजवला आहे. या विषाणूंची लागण झाल्याने लाखो लोकांना आपला बहुमूल्य जीव गमवावे लागले. आता राजकीय नेते, खेळाडू आणि त्यांचा परिवारातील सदस्य यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे पुढे येत आहे. मागील आठवड्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीलादेखील कोरोना विषाणूने घेरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता नुकतेच बांगलादेशचा माजी कर्णधार मशरफे मुर्तझाची सासू होस्ने आरा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शनिवारी मशरफेच्या सासूची कोरोना तपासणी करण्यात आली त्यात रविवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे. सासूला कोरोनाची लागण झाल्याने मशरफे रविवारी झालेल्या ‘क्रिकेटर वेलफेयर एसोसिएशन ऑफ बांग्लादेश’ च्या बैठकीस उपस्थित राहू शकला नाही.
बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मशरफे सध्या खूपच तणावात आहे. तसेच बांगलादेशी क्रिकेट संघात त्याच्या विरोधी वातावरण निर्माण झाले आहे.
ब्रेसलेट पुन्हा गिफ्ट म्हणून मिळाले
कोरोनाच्या संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी मशरफे काम करत आहे. तसेच त्याने त्याचा अर्धा पगार ही या संकटग्रस्त लोकांना दान केला आहे. तो मार्च महिन्यापासून लोकांना अन्नधान्य वाटप करत आहे. यासाठी त्याने 18 वर्षांपूर्वी खरेदी केलेले एक ब्रेसलेट विकून टाकला. ज्या फॅनने हे ब्रेसलेट खरेदी केले त्याने पुन्हा मशरफेला ते गिफ्ट म्हणून दिले.
बोर्डावर केले गंभीर आरोप
मशरफे मुर्तजाने काही दिवसांपूर्वी बांगलादेश संघाच्या कर्णधाराचा पदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या ऐवजी संघाची धुरा तमीम इक्बालच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मशरफेला अजून काही दिवस क्रिकेट खेळायची इच्छा आहे. तरीही बांगलादेशी क्रिकेट बोर्ड त्याला निवृत्त होण्यास भाग पाडत असल्याचा आरोप देखील मशरफेने काही दिवसांपूर्वी केला होता.
विश्वचषकात ‘सुपर फ्लॉप’
2019 विश्वचषकात 36 वर्षीय मशरफे मुर्तजा सुपर फ्लॉप ठरला होता. त्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्यांच्याकडून राजीनामा घेतला . त्याने आपल्या कारकिर्दीत 36 कसोटीत 78 , 220 वनडेत 270 , 54 टी20 सामन्यात 42 बळी टिपले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
लवकरच तयार होणार १९ पीचवालं देशातील पहिलं मैदान, महाराष्ट्रातील लाल मातीचा केलाय खास उपयोग
गंभीर म्हणतो; ती गोष्ट मिळवली नाही तर कोहलीची कारकिर्द अधुरीच
हा दिग्गज खेळाडू म्हणतो, ‘जमीन घेऊन धान्य पिकवेल आणि ते गरीब कुटुंबाला वाटेल’