न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज अजाज पटेल सध्या मुंबईत सुरू असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी कर्दनकाळ बनला आहे. भारतीय संघाचे आघाडीचे ६ फलंदाज आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकल्यानंतर अष्टपैलू आर अश्विन यालाही त्याने सोडले नाही. पहिल्याच चेंडूवर त्याने अश्विनची दांडी उडवली. परंतु त्यानंतर मैदानावर जे झाले, त्याने खेळाडूंसह सामना दर्शकांनीही हशा फुटला.
तर झाले असे की, ७२ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा अजाजच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्यानंतर कसोटीत ५ शतके करणारा अश्विन फलंदाजीला आला होता. परंतु अजाजने अश्विनला त्याचा पहिला चेंडू असा काही टाकला की, अश्विनलाही नकळत चेंडूने जाऊन यष्ट्या उडवल्या.
यावर पंचांनी बाद दिल्यानंतर अश्विनला वाटले की, न्यूझीलंडच्या यष्टीरक्षकाने झेलबादसाठी पंचांकडे मागणी केली असावी. म्हणून त्याने त्वरित डीआरएस घेतला. मात्र गोलंदाज अजाजला विकेटचा जल्लोष साजरा करताना पाहिल्यानंतर आपला काहीतरी गोंधळ उडाल्याचे त्याच्या लक्षात आले आणि पटकन मागे वळून पाहिले. यावर आधीच आपल्या बत्त्या गुल झाल्या असल्याच्या त्याच्या लक्षात आले. हे पाहून अश्विनने डीआरएसवर तिसऱ्या पंचांचा निर्णय येण्यापूर्वीच सरळ मैदान सोडले.
अश्विनच्या या गोंधळ उडालेल्या प्रसंगाचा क्षण कॅमेरात झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. या गमतीशीर प्रसंगानंतर चाहते सोशल मीडियावर त्याची मजा घेत आहेत.
This is brilliant stuff.
Got ‘em! 😂 #INDvNZ #Ashwin https://t.co/MDQfvxjsgB— Jason Tan (@JSLTan) December 4, 2021
https://twitter.com/SJ___155/status/1466984893301379072?s=20
अजाज पटेलने रचला इतिहास
दरम्यान अश्विनला पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत करणाऱ्या अजाजने मात्र या सामन्यात इतिहास रचला आहे. त्याने पहिल्या डावात भारताच्या सर्वच्या सर्व १० फलंदाजांना बाद केले आहे. यासह तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात सर्व १० विकेट्स घेणारा केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनसह विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि शतकवीर मयंक अगरवालसारखे फलंदाज त्याने बाद केले आहे. त्याच्यापूर्वी भारताचे अनिल कुंबळे आणि इंग्लंडचे जिम लेकर यांच्या नावे या भीमपराक्रमाची नोंद होती.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग.! ओमिक्रॉनच्या संकटातही भारताचा आफ्रिका दौरा होणार, सामन्यांची संख्याही ठरली – बीसीसीआय
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित आगरकर
हॉकीसाठी शाळा सोडून केली कठोर मेहनत, आता बनला भारताच्या विजयाचा शिल्पकार