भारतीय संघाचा माजी दिग्गज सलामीवीर गौतम गंभीर मागच्या काही वर्षांपासून आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिला आहे. नुकताच आशिया चषकादरम्यान त्याचा एक व्हिडिओ वादाचे कारण ठरला. अशात या चर्चा काही प्रमाणात कमी होत असतानाच पुन्हा गंभीर चर्चेत आला आहे. त्याने भारताचा सर्वोत्तम कर्णधार निवडताना माजी दिग्गज एमएस धोनी आणि विराट कोहली यांची नावे न घेता अनिल कुंबळे याचे नाव घेतल्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत.
मुळचा दिल्लीचा असणारा गौतम गंभीर (Gautam Gambhir) सध्या दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आला आहे. 2019 पासून तो दिल्लीच्या खासदाराची भूमिका पार पाडत आहे. मात्र, क्रिकेटच्या मैदानातून तो कधी दूर झाला नाही. आजही गंभीर आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान समालोचक म्हणून काम करतो. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारतीय संघाला लाभवेल्या सर्वोत्तम कर्णधाराविषयी स्पष्टीकरण दिले. गंभीरच्या मते अनिल कुंबळे (Anil Kumble) भारतीय संघाला मिळालेला आजपर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार आहे.
यावेळी त्याच्यपुढे एमएस धोनी, विराट कोहली, सौरव गांगुली आणि कपिल देव अशा यशस्वी कर्णधारांचे पर्याय दिले गेले होते. पण त्याने निवडले मात्र कुंबळेला. अनेकांनी गंभीरने हे उत्तर वैयक्तिक वादमुळे दिले, असेही म्हटले आहे. सोशल मीडियावर याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. कर्णधार म्हणून कुंबळेची कारकीर्द पाहिली, तर त्याने 14 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. यातील अवघ्या 3 सामन्यात भारताला विजय मिलवला आणि 5 सामन्यात संघ पराभूत झाला. राहिलेले सहा सामने अनिर्णीत राहिले.
कुंबळेच्या एकंदरीत कारकिर्दीवर नजर टाकली, तर तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज राहिला आहे. फिरकीपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 403 सामन्यांमध्ये 956 विकेट्स घेतल्या आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्सच्या बाबतीत कुंबळेचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. (According to Gautam Gambhir, Anil Kumble is the best captain the Indian team has ever had)
महत्वाच्या बातम्या –
पुन्हा दिसले धोनीचे टेनिसप्रेम! यूएस ओपनमधील व्हिडिओ व्हायरल, कार्लोस अल्कारेजच्या जवळ बसलाय भारतीय दिग्गज
विश्वचषकात भारताविरुद्ध ओपनिंगसाठी ‘या’ कांगारू अष्टपैलूचा वॉर्नरला भक्कम पाठिंबा; म्हणाला, ‘तो GOAT…’