भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी याला टेनिसची देखील चांगलीच आवड आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी फक्त आयपीएल खेळतो. अशात विश्वचषकविजेत्या कर्णधाराला आपले इतर आवडी जवण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत आहे. गुरुवारी (7 सप्टेंबर) धोनी धोनीने यूएस ओपनमध्ये कार्लोस अल्कारेज आणि अलेक्जेंडर ज्वेरेव यांच्यातील सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होता.
एमएस धोनी मागच्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या जर्सीत दिसत नाहीये. पण इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमांतून चाहत्यांना तो खेळताना दिसतो. त्याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. आगामी हंगामात देखील धोनी या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. अद्याप आयपीएलमधून निवृत्तीची विचार धोनीने केलेला नाही, असेच दिसते. जागतिक क्रिकेटमधील दिग्गज धोनीला टेनिसची खास आवड आहे. दरम्यान, धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत यूएस ओपनच्या उपांत्य सामन्यासाठी पात्र ठरलेल्या कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याच्या अगदी मागे धोनी बसलेला दिसत आहे. चाहत्यांनी हा व्हिडिओ तुफान व्हायरल केला आहे.
Our focus as always! 🎯#WhistlePodu #Yellove 🦁💛pic.twitter.com/PZHVcGbrfY
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 7, 2023
गुरुवारी (7 सप्टेंबर) तो पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धा पाहण्यासाठी मैदानात आला नव्हता. यापूर्वी 2022 मध्येही विंबलन ओपन स्पर्धेत राफेल नडाल आणि टेलर फिर्ट्स यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्यासाठी तो मैदानात उपस्थित होता. तसेच मागच्याच वर्षी यूएस ओपनचा सामना पाहण्यासाठी धोनी कपिल देव यांना सोबत घेऊन गेला होता. हा सामना कार्लोस अल्कारेज आणि जननिक सिनर यांच्यात झाला होता. कार्लोस अक्लारेज यावेळी सलग दुसऱ्यांत्या अंतिम सामन्यात पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रॉजर फेडरर याने 2004 ते 2008 या सलग पाच हंगामांमध्ये यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर एकही खेळाडू मेन्स सिंगल्समध्ये विजेतेपद आपल्याकडे कायम राखू शकला नाही. गुरुवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात कार्लोस अल्कारेजने जन्मनीच्या अलेक्जँडर ज्वेरेव याला पराभूत केले. स्पेनच्या या खेळाडून जर्मनीच्या ज्वेरेवला 6-3, 6-2, 6-4 अशा अंतराने मात दिली. आता उपांत्य सामन्यात अल्कारेज आणि रुसचा डॅनियर मेदवेदेव यांच्यात लढत होईल.
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषक जिंकण्यासाठी सेहवागचा टीम इंडियावर पूर्ण विश्वास, पण दादाने व्यक्त केली शंका, ट्वीट व्हायरल
ब्रेकिंग! WC 2023 साठी नेदरलँड्सने घोषित केला 15 सदस्यीय संघ, ताफ्यात 2 अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन