ODI World Cup 2023क्रिकेटटॉप बातम्या

WC 2023 साठी नेदरलँड्सने घोषित केला 15 सदस्यीय संघ, ताफ्यात 2 अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजेच आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या महिनाभरापूर्वीच सहभागी संघ आपला 15 सदस्यीय संघ घोषित करत आहेत. अलीकडेच भारत आणि दक्षिण आफ्रिकेने संघ घोषित केला होता. यामध्ये आता आणखी एका संघाची भर पडली आहे. नेदरलँड्सने आपला अनुभवी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात 2 खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) स्पर्धेसाठी रोएलोफ व्हॅन डर मर्व्ह (Roelof van der Merwe) आणि कॉलिन एकरमन (Colin Ackermann) यांना नेदरलँड्स (Netherlands) संघाच्या 15 सदस्यीय ताफ्यात स्थान देण्यात आले आहे. नेदरलँड्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्कॉट एडवर्ड्स याच्या खांद्यावर आहे.

विश्वचषकासाठी नेदरलँड्सच्या ताफ्यात सामील झालेल्या व्हॅन डर मर्व्ह याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. तो अष्टपैलू आहे. त्याने 16 वनडे सामन्यात 19 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, 96 धावाही केल्या आहेत. तसेच, 51 आंतरराष्ट्रीय सामन्यात 56 विकेट्स घेतल्या आहेत. आर्यन दत्त हादेखील चांगला गोलंदाज आहे. त्याने 25 वनडे सामन्यात 20 विकेट्स घेतल्या आहेत. बास डी लीड हा अनुभवी फलंदाज आहे. त्याने 30 वनडे सामन्यात 765 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्याने 1 शतक आणि 2 अर्धशतकांचाही पाऊस पाडला आहे.

कर्णधार एडवर्ड्स याच्याविषयी बोलायचं झालं, तर त्यानेही अनेक महत्त्वाच्या क्षणी संघासाठी झंझावाती खेळी साकारत विजय मिळवून दिला आहे. तो विश्वचषक संघात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसेल. विशेष म्हणजे, विश्वचषक 2023 स्पर्धेत नेदरलँड्स संघाचा पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे. याव्यतिरिक्त नेदरलँड्स भारताविरुद्धही भिडणार आहे. 12 नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथे हा भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात सामना खेळला जाणार आहे.

विश्वचषक 2023साठी नेदरलँड्स संघ
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डौड, बास डी लीड, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन एकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सीब्रँड एंजेलब्रेच.

हेही वाचाच-
‘मूर्ख बनू नका…’, माजी दिग्गजाने निवडकर्त्यांना झाप झाप झापलं, ‘या’ खेळाडूच्या निवडीवर उठवले प्रश्न
वर्ल्डकपसाठी फॉर्ममध्ये नसलेला खेळाडू टीम इंडियात; दिग्गज म्हणाला, ‘तो लकीये, नाहीतर त्याच्या जागी…’

Related Articles