इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना शुक्रवारी (6 नोव्हेंबर) खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सनरायझर्स हैदराबादने पराभव केला. या पराभवामुळे बेंगलोरचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. 13 हंगाम खेळूनही बेंगलोरने एकदाही किताब पटकावला नाही. मागील 8 वर्षे विराट कोहली या संघाचे नेतृत्व करत आहे. मात्र, त्यानेही अपेक्षेनुसार संघांचे नेतृत्व केले नाही. आता भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने त्याच्या नेतृत्वावर आणि बेंगलोर संघाच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
बेंगलोरला कर्णधार बदलण्याची गरज आहे का?
गौतम गंभीर ईएसपीएन क्रिकइन्फो या क्रीडा वेबसाईटशी बोलत होता. त्याला विचारण्यात आले की बंगलोरचा कर्णधार बदलण्याची गरज आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना गंभीर म्हणाला की, “शंभर टक्के. वास्तविक समस्या ही जबाबदारीची आहे. 8 वर्षे आरसीबीने किताब जिंकलेला नाही. हा दीर्घ कालावधी आहे. ट्रॉफी न जिंकल्यामुळे आपण इतर कर्णधार अथवा इतर कोणत्याही खेळाडूला संघात स्थान देत नाही. ही जबाबदारीची बाब आहे.”
पराभवासाठी कोण आहे जबाबदार?
गंभीर विराट कोहलीचे नाव न घेता म्हणाला की ” सहाय्यक कर्मचारी, व्यवस्थापन आणि नेतृत्व हे या संघाची समस्या आहे. जोपर्यंत पराभवासाठी नेतृत्वाला जबाबदार धरले जात नाही, तोपर्यंत असेच चालू राहल. मी सहाय्यक कर्मचारी, प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, प्रत्येकासाठी अतिशय दुःखी आहे. दरवर्षी प्रशिक्षक बदलला जातो. परंतु समस्या दुसरीच आहे.”
संघाच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
गंभीर पुढे म्हणाला, “तुम्ही या संघाचा कितीही बचाव केला तरीही माझ्या मते हा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचण्यास सक्षम नव्हता. हा संघ फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात अपयशी ठरला. गोलंदाजांनी थोडी चांगली कामगिरी केली. जर संघाला शेवटच्या षटकांत 18-19 धावांचा बचाव करायचा असेल आणि नवदीप सैनी किंवा मोहम्मद सिराज सारख्या गोलंदाजांची शेवटची दोन षटके असतील, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील फलंदाजासमोर त्यांना अवघड जाईल.”
महत्त्वाच्या बातम्या-
वॉर्नर ‘आऊट’ की ‘नॉट आऊट’? नक्की काय आहे वाद
आनंदाची बातमी! ‘या’ छोट्या शहरात सुरु होतेय एमएस धोनीची क्रिकेट अकॅडेमी
नटराजनच्या यॉर्कर समोर ‘मिस्टर 360’ सुद्धा फेल; उडवला थेट मधला स्टंप, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख –
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा
बेंगलोरचे तेराव्यांदा स्वप्नभंग होण्यास कारणीभूत ठरले हैदराबादचे ‘हे’ ५ शिलेदार