इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला गुरुवारी (२५ ऑगस्ट) मँचेस्टर येथे सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारल्यानंतर यजमान संघाने दुसऱ्या सामन्यात शानदार सुरुवात केली. सामन्याच्या पहिल्या दिवसावर पूर्ण वर्चस्व गाजवत दक्षिण आफ्रिकेला अडचणीत टाकले. इंग्लंडचे दोन्ही अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड पहिल्या दिवसाचे मानकरी ठरले.
England end day one on fine note with a strong unbeaten partnership reviving their innings 👊#WTC23 | #ENGvSA | Scorecard: https://t.co/GwXA1oXaEc pic.twitter.com/zCuQZZxPhx
— ICC (@ICC) August 25, 2022
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय उलटा पडला. अँडरसन, ब्रॉड व कर्णधार बेन स्टोक्सने पाहुण्यांचा निम्मा संघ ७६ धावात गारद केला. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेल्या कगिसो रबाडाने फलंदाजीत मोठे योगदान देत सर्वाधिक ३६ धावा केल्या. परिणामी दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ १५१ धावांत सर्वबाद झाला. अँडरसन व ब्रॉडने प्रत्येकी तीन बळी मिळवले.
पहिल्याच दिवशी फलंदाजीची संधी मिळालेल्या इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. लीस चार, पोप २३ व रुट ९ धावांवर बाद झाल्याने इंग्लंडची अवस्था तीन बाद ४३ झालेली. मात्र, त्यानंतर सलामीवीर झॅक क्राऊलीने ७७ चेंडूत नाबाद १७ धावांची संयमी व जॉनी बेअरस्टोने ४५ चेंडूत नाबाद ३८ धावा करत संघाला दिवसाखेर तीन बाद १११ पर्यंत नेले. इंग्लंड संघ अजूनही ४० धावांनी पिछाडीवर असून दुसऱ्या दिवशी ते आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करतील.
या सामन्यात उतरताच इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटचा इतिहासात मायदेशात शंभर कसोटी खेळणारा पहिला क्रिकेटपटू बनला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकातील ‘हे’ विक्रम मोडणे नाहीये सोपे, सेहवागने केलाय गोलंदाजीत अजब कारनामा
भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचा सर्वात अवघड ‘पेपर फुटला’, महत्वाच्या फलंदाजाची कमजोरी झाली उघड
हरभजनला मारायला हॉटेलच्या रूमपर्यंत गेलेला अख्तर, ‘या’ गोष्टीमुळे पेटला होता वाद