भारतीय संघाने १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा वनडे विश्वचषक उंचावला होता. त्यावेळी २४ वर्षीय युवा खेळाडू कपिल देव यांनी इंग्लंडमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. ३९ वर्षांपूर्वी कुणालाही अपेक्षा नव्हती की, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडसारख्या दिग्गज संघांसमोर बारतीय संघ विश्वचषक उंचावू शकतो. मात्र, कपिल देव यांनी या अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवले होते. कपिल यांनी फक्त गोलंदाजीतून नाही, तर फलंदाजीतूनही भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. ही कामगिरी त्यांनी आजच्याच दिवशी म्हणजे १८ जून, १९८३ रोजी केली होती. त्यांनी झिम्बाब्वेविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यात नाबाद १७५ धावांची खेळी केली होती. वनडे विश्वचषकातील ही त्यावेळची सर्वोच्च धावसंख्या होती.
भारताच्या १७ धावांवर ५ विकेट्स गेल्या असताना कपिलने केवळ १३८ चेंडूत १६ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १७५ धावांची खेळी साकारली होती. पुढे त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर गतविश्वविजेते वेस्ट इंडिजलाही पराभूत करून विश्वचषक भारताला मिळवून दिला.
Talk about leading from the front! 🙌 🙌
🗓️ #OnThisDay in 1983, captain @therealkapildev slammed 1⃣6⃣ Fours & 6⃣ Sixes to hammer 1⃣7⃣5⃣* off 1⃣3⃣8⃣ balls against Zimbabwe in the 1983 World Cup at the Tunbridge Wells. #TeamIndia 🇮🇳 pic.twitter.com/PIvoRrI64z
— BCCI (@BCCI) June 18, 2022
त्या झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात त्यांच्या नंतरची दुसरी सर्वोच्च धावसंख्या सय्यद किरमानी (Syed Kirmani) यांची नाबाद २४अशी होती. भारताने ८ गड्यांच्या मोबदल्यात २६६ धावा केल्या आणि त्यानंतर ३१ धावांनी विजय मिळवताना विरोधी संघाला २३५ धावांवर रोखले.
रोडोडेंड्रॉनची (Rhododendron) फुले
या सामना मैदानावर उपस्थित असलेल्या ४००० लोकांव्यतिरिक्त कोणालाही पाहता आला नव्हता. कारण बीबीसी व इतर प्रसार माध्यमांच्या संपामुळे हा सामना दाखविण्यात आला नाही. या मैदानाची बाउंड्री ६० ते ६५ मीटर लांब होती. तसेच ती निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या रोडोडेंड्रॉनच्या फुलांच्या झाडांनी बहरलेली होती. फक्त याच क्रिकेट मैदानावरच ही फुले आढळतात. तसेच ते एक काउंटी संघाचे छोटे मैदान आहे.
लोकांना अजूनही आठवतो तो सामना
तेथील जवळच राहणाऱ्या एका दर्शकाने तो सामना पहिला होता. त्या सामन्यात सुमारे ४००० प्रेक्षक उपस्थित होते. या मैदानाचा हा पहिला आणि शेवटचा वनडे आंतरराष्ट्रीय सामना होता, तेव्हा वातावरणामुळे चेंडू स्विंग होत होता आणि या कारणामुळेच गावसकरसह भारताचे ४ फलंदाज लवकर बाद होऊन तंबूत परतले होते.
हा सामना झिम्बाब्वे संघ जिंकेल, असे प्रत्येकाला वाटत होते, पण ज्याची कुणीही कल्पना कोणी केली नव्हती ते कपिलने करुन दाखवले होते. त्यादिवशी जोरदार वारा होता आणि कपिलने वाऱ्याच्या विरूद्ध ऑफ साइडमध्ये चौकार आणि षटकार ठोकले होते. जर त्या डावाची तुलना करायचीच झाली तर ती थेट १९८१ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध फॉलोऑननंतर इयान बोथम यांनी केलेल्या शतकी खेळीशीच.
या ऐतिहासिक सामन्याबद्दल भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांनी म्हटले आहे, की झिम्बाब्वे विरुद्धचा सामना हा फक्त एक सामना नव्हता. या सामन्यामुळे संपूर्ण संघात एक आत्मविश्वास निर्माण करणारा तो क्षण ठरला.
तेव्हा अनेकांना वाटत होते की आम्ही मोठ्या चार संघांना हरवू शकत नव्हतो. परंतू त्या सामन्याने आत्मविश्वास दिला की आम्ही कोणत्याही संघाला सहज पराभूत करु शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! सर्वात मोठी धावसंख्या, सर्वाधिक षटकार, नेदरलँडविरुद्ध इंग्लंडने रचले अर्धा डझन विक्रम
आवेश खानने वडिलांना समर्पित केल्या आपल्या ४ विकेट्स, कारण जाणून तुम्हीही ठोकाल सलाम!