ऑस्ट्रेलियन संघाचा फिरकीपटू आणि आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऍडम झम्पाने आयपीएल २०२१ स्पर्धेतून माघार घेतली होती. ऑस्ट्रेलियन सरकारने भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारतातून येणाऱ्या विमानावर बंदी घातली आहे. त्यामुळे वैयक्तिक कारणाचा हवाला देत तो उर्वरित हंगामातून बाहेर पडला होता. अशातच स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर त्याने आता धक्कादायक वक्तव्य केले आहे.
झम्पाने सिडनी मॉर्निंग हेराल्डला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मला युएईमध्ये अधिक सुरक्षित वातावरण वाटत होते. गतवर्षी ही स्पर्धा (आयपीएल) युएईमध्ये आयोजित करण्यात आली होती. मी आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी बायो बबलमध्ये वावरलो आहे. परंतु भारतात मला सर्वाधिक असुरक्षित वाटत होते. आम्हाला इथे नेहमीच स्वच्छतेबद्दल सांगितले जाते आणि अतिरिक्त दक्षता घ्यावी लागते. मला वाटते की हे खूप असुरक्षित होते.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “सहा महिन्यांपूर्वी आयपीएल २०२० चे आयोजन युएईमध्ये करण्यात आले होते. मला तिथे खूप सुरक्षित वाटत होते. वैयक्तिकरित्या मला असे वाटते की आयपीएल २०२१ चा हंगामदेखील यूएईमध्ये खेळवता आला असतीा पण अर्थातच बरेच राजकारणीही त्यात जोडले गेले होते. याचवर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धा देखील होणार आहे. कदाचित क्रिकेट विश्वात पुढील चर्चा यावर असेल. सहा महिने बराच काळ आहे.”
मायदेशी परतण्यामागे अनेक कारणे
तो म्हणाला, “भारतात कोरोनाची परिस्थिती खूपच वाईट आहे. तसेच मला संघात खेळण्याची संधीही मिळाली नाही. मी प्रशिक्षण घेण्यासाठी जात होतो आणि मला काहीच प्रेरणा मिळत नव्हती. तसेच बायो बबलमध्ये राहून थकवा जाणवू लागला होता. अशातच मायदेशी जाण्यासाठी विमानसेवेशी निगडित बातम्या देखील येत होत्या. त्यावेळी मला वाटले होते की, मायदेशी परतण्यासाठी ही योग्य वेळ आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीची चेन्नई ठरणार ‘सुपर’ की हैदराबादचा होणार ‘सनराईज’, पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
DCच्या गोलंदाजाकडून मोठी चूक झाली, नशीब पंचांनी फक्त वॉर्निंग दिली; नाहीतर पूर्ण संघाला…