---Advertisement---

‘दहा लाखांचा नाही करोडोंचा खेळाडू बनून दाखव’; …अन् दिल्लीच्या शिलेदाराने गुरू द्रविडचे शब्द खरे केले

On: बुधवार, एप्रिल 28, 2021 2:34 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग हा एक असा मंच आहे, जिथे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट खेळणारे क्रिकेटपटू एकत्र येऊन खेळतात. बऱ्याचदा अनकॅप खेळाडूही त्यांच्या अविश्वसनीय प्रदर्शनाने भल्याभल्या दिग्गजांची बोलती बंद करताना दिसतात. आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा एक अनकॅप खेळाडू असेच काहीसे प्रदर्शन आहे.

दिल्लीकडून त्यांचा सलामीचा सामना खेळताना त्याने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीला तंबूत धाडले होते. तर नुकतीच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या कर्णधार विराट कोहलीचीही त्याने शिकार केली होती. हा खेळाडू अजून कोण नसून तो, २४ वर्षीय वेगवान गोलंदाज आवेश खान आहे.

तब्बल १४० किमी दर ताशीपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करु शकणाऱ्या या खेळाडूने भारतीय दिग्गज राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली गोलंदाजीचे धडे गिरवले होते. त्यावेळी द्रविडने त्याला म्हटलेले शब्द आता त्याने जवळपास खरे करुन दाखवले आहेत.

१० लाखांचा नाही कोटींचा खेळाडू बनून दाखव
हा किस्सा आयपीएल २०१६ मधील आहे. या हंगामातील लिलावात त्याला कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता. त्यामुळे तो खूप निराश झाला होता. यावेळी १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या या गोलंदाजाला द्रविडने प्रेरित केले होते. १० लाख नव्हे तर कोटींची कमाई करणारा खेळाडू बनून दाखव, या शब्दात द्रविडने आवेशला प्रेरणा दिली होती.

त्यानंतर आवेशने केवळ वेगवान गोलंदाजी न करता यॉर्कर आणि स्लो कटर्स गोलंदाजीचा सराव केला. याबरोबरच वजन कमी करत स्वत:ला तंदुरुस्त बनवले. २०१७ साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यापुढील हंगामात दिल्ली संघाने ७० लाखांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सहभागी केले होते. परंतु मागील २ वर्षात त्याला स्वत:स सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळाली नव्हती.

संघ प्रशिक्षक आणि कर्णधाराचा जिंकला विश्वास
मात्र दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि नवोदित कर्णधार रिषभ पंत यंदा त्याच्या कामगिरीने फार प्रभावित आहेत. याच कारणामुळे संघात उमेश यादव, इशांत शर्मासारखे अनुभवी गोलंदाज असतानाही त्यांनी हंगामातील पहिल्याच सामन्यात आवेशला अंतिम ११ जणांमध्ये संधी दिली होती.

आतापर्यंत या धुरंधराने आयपीएल २०२१ मध्ये ६ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ३२ धावांवर ३ विकेट्सच्या सर्वोत्तम कामगिरीसह एकूण १२ विकेट्स चटकवल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलमधून माघार घेतलेल्या झम्पाचे धक्कादायक वक्तव्य; म्हणे, ‘भारतातील वातावरण सुरक्षित वाटत नव्हतं’

यष्टीमागे समालोचन करण्यात रिषभ बनला मास्टर! लाईव्ह सामन्यात म्हटले असे काही की समालोचकही हसून लोटपोट

DCच्या गोलंदाजाकडून मोठी चूक झाली, नशीब पंचांनी फक्त वॉर्निंग दिली; नाहीतर पूर्ण संघाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---