भारतीय महिला संघ सध्या न्यूझीलंड (india tour of newzeland) दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मंगळवारी (१५ फेब्रुवारी ) या मालिकेतील दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाला ३ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. यासह भारतीय संघ या मालिकेत २-० ने पिछाडीवर आहे. दरम्यान या पराभवानंतर इंग्लंडची समालोचक इसाबेल वेस्टबरी हिने ट्विट करत भारतीय फलंदाज मिताली राजच्या (mitali raj)फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केला होता. ज्यावर भारतीय क्रिकेटपटूने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
इसाबेल वेस्टबरीने ट्विट करत लिहिले की, “मिताली राज सध्या भारताची सर्वात चांगली आणि सर्वात वाईट फलंदाज आहे..” या ट्विटवर प्रत्युत्तर देत भारतीय महिला क्रिकेटपटू वीआर वानिताने ट्विट करत लिहिले की, “मिताली ही सर्वोत्तम फलंदाज आहे यात काहीच शंका नाहीये. भारतीय क्रिकेटची एवढी काळजी करण्याऐवजी तुम्ही इंग्लंडची काळजी करा.”
वीआर वनिताने केलेल्या ट्विटवर इसाबेल वेस्टबरीने उत्तर देत लिहिले की, ” ठीक आहे, ठीक आहे,मी सहमत आहे. निश्चितच हे ठीक आहे? इमो आणि मिताली हे दोघेही सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंपैकी एक आहेत. परंतु हे भारताच्या प्रगतीसाठी पूर्णपणे अयोग्य आहे आणि हो, माझ्यावर विश्वास ठेव, मला इंग्लंडची खूप काळजी वाटते.”
इसाबेल वेस्टबरीने केलेले ट्विट पाहून वनिताने आणखी एक ट्विट केले, ज्यावर तिने लिहिले की, “मला माफ करा, तुम्ही किती आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत? विकिपिडियावर शोधलं परंतु एकही आकडेवारी दिसून आली नाही.”
Mithali Raj is both the best and worst thing about Indian cricket rnow. #NZvIND
— Isabelle Westbury (@izzywestbury) February 15, 2022
न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय महिला संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २७० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने ४९ व्या षटकात लक्ष्य पूर्ण केले.
महत्वाच्या बातम्या :
आज ईडन गार्डन्सवर रंगणार भारत – वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी२० सामना, ‘अशी’ असू शकते प्लेइंग ११
केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत- वेस्ट इंडिज पहिला टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर