---Advertisement---

आनंदाला नाही तोटा! आयपीएल लिलावात १० कोटींची बोली लागल्याने विंडीजच्या खेळाडूने दिली ‘एवढ्या’ रकमेची पिझ्झा पार्टी

On: बुधवार, फेब्रुवारी 16, 2022 10:14 AM
Nicholas-Pooran
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2022) १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडला. बंगळुरू येथे पार पडलेल्या या लिलावात अनेक खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागली. यातील ११ खेळाडू असे होते, ज्यांना १० कोटींहून अधिकची रक्कम फ्रँचायझींनी मोजली. या ११ खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन (Nicholas Pooran) याचा देखील समावेश आहे. पूरननेही त्याला मिळालेल्या मोठ्या बोलीचा आनंद वेस्ट इंडिज संघातील संघसहकाऱ्यांबरोबर अनोख्या पद्धतीने साजरा केला. 

पूरनला लागली मोठी बोली
आयपीएल २०२२ लिलावात २६ वर्षीय पूरनसाठी अनेक संघांमध्ये चूरस पाहायला मिळाली होती. पण अखेर सनरायझर्स हैदराबादने या यष्टीरक्षक फलंदाजासाठी सर्वाधिक १०.७५ कोटी रुपयांची बोली लावली आणि त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.

संघसहकाऱ्यांसाठी पिझ्झा पार्टी
आयपीएल लिलावात एवढी मोठी बोली लागल्याने पूरनने आपल्या संघसहकाऱ्यांबरोबर आनंद व्यक्त केला. खरंतर सध्या वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आहे आणि १६ फेब्रुवारीपासून कोलकाता येथे सुरू होणाऱ्या टी२० मालिकेची तयारी करत आहे. याचदरम्यान आयपीएल लिलाव झाल्याने पूरन वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंबरोबर होता. सध्या भारत आणि वेस्ट इंडिज संघातील खेळाडू बायोबबलमध्ये आहेत. त्याचमुळे पूरनलाही बायोबबलच्या नियमांचा विचार करून आनंद साजरा करावा लागला.

त्याने बायोबबलमध्ये राहून संघसहकाऱ्यांना पिझ्झा पार्टी दिली. त्याला या पिझ्झापार्टीसाठी तब्बल १५ हजारांचा खर्च आला. याबद्दल स्थानिक मॅनेजरने पीटीआयला माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘बायोबबलमध्ये बाहेरचे पदार्थ आणण्याची परवानगी नसल्याने त्याने हॉटेल शेफलाच १५ पिझ्झांची ऑर्डर दिली होती.’

खेळाडू बायोबबलमध्ये असल्याने त्यांना सर्व गोष्टी सानिटाईज करून दिल्या जातात. स्थानिक मॅनेजरने पुढे सांगितले की, ‘त्यासाठी एका योग्य शेफचीही गरज असते. खेळाडू ग्रेड वन बायोबबलमध्ये असल्याने आम्हाला त्यांना पदार्थांचे तापमान आणि ते कसे सानिटाईज केले जाते हे सांगावे लागते. त्यानंतर ते त्यांना रुममध्ये पाठवले जाते. पूरनकडे १५ पिझ्झा बॉक्स पाठवले होते आणि ते सर्व रुममध्ये पोहचण्याआधी सानिटाईज करण्यात आले होते. पिझ्झांचे पैसे खेळाडूलाच भरावे लागले.’ (Nicholas Pooran Gives Pizza Treat to Teammates)

पूरनची कामगिरी
पूरन वेस्ट इंडिजचा एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातो. पण गेल्या आयपीएल हंगामात पंजाब किंग्सकडून खेळताना त्याची कामगिरी फारशी खास झाली नव्हती. असे असतानाही त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवत हैदराबादने मोठी बोली लावली आहे. पूरनने आत्तापर्यंत २१४ टी२० क्रिकेट सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २४.९० च्या सरासरीने ४११० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १ शतक आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत- वेस्ट इंडिज पहिला टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

डोमेस्टिक क्रिकेटचा ‘बादशहा’ वसीम जाफरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

क्रिकेटजगताला सुन्न करणारी ‘ती’ घटना, जेव्हा फलंदाजी करताना अचानक झाला होता क्रिकेटरचा मृत्यू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---