भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर सर्व युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान राहिले आहे. ज्या खेळाडूंना सचिन सोबत खेळण्याची संधी भेटली ते स्वत:ला खूपच भाग्यशाली समजतात आणि ज्या खेळाडूंना सचिन सोबत खेळण्याची संधी नाही मिळाली ते नेहमीच तेंडूलकरला भेटण्याच्या संधीची वाट पाहत असतात. आत्ताही कोणत्याही खेळाडूला सर्वोत्तम फलंदाजाबद्दल विचारले असता अनेक जण तेंडूलकरचेच नाव घेतात. ह्यामध्ये अफगाणिस्थानचा राशीद खान काही मागे नाही.
‘क्रिकविक’च्या युटूब चानेलशी संवाद साधताना राशीदने आपली इच्छा व्यक्त केली. राशीदला एक प्रश्न विचारण्यात आला की, गेल्या १३ वर्षात सचिन फक्त एकवेळा लेग स्पिनरविरुद्ध बाद झाला आहे. त्यावर राशीदने उत्तर दिले की, “म्हणूनच मला सचिनच्या विरुद्ध गोलंदाजी करण्यास आवडेल. सचिन खूप कमी वेळा लेग स्पिनरविरुद्ध बाद झाला आहे. तसेच मला त्याला बाद करण्यापेक्षा त्याला गोलंदाजी करण्यास आवडेल. सचिनसमोर गोलंदाजी करणे म्हणजे एका स्वप्नासारखेच असेल”.
राशीदला माजी पाकिस्तानी कर्णधार इंजमाम-उल-हक विरुद्ध गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. राशीद याबद्दल सांगतो की, “महान फलंदाजांसमोर गोलंदाजी करणे म्हणजे एक मोठा क्षण असतो. कारण त्यावरून अंदाज येतो की महान फलंदाज कसे आपला चेंडू खेळून काढतात. हाच फरक असतो ज्यामध्ये आपल्याला कळते आपण महान फलंदाजांना गोलंदाजी केल्यावर आणि इतर फलंदाजांना गोलंदाजी केल्यावर आपण नेमकी काय चूक करतो. २०१५ साली मी त्याला काही चेंडू टाकले आणि एक–दोन चेंडूवर त्याला माझ्या जाळ्यात अडकवले होते. दिग्गजांसमोर गोलंदाजी करणे एक खूप मोठी गोष्ट आहे”.
राशीद खान सध्याचा अफगाणिस्तानचा महत्वाचा खेळाडू असून त्याने खूप सामने आपल्या गोलंदाजीच्या बळावर जिंकवून दिले आहेत. राशीदने खानने आजवर एकदिवसीय सामन्यांत १४०, कसोटी सामन्यांत ३४ आणि, आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत ९५ गडी बाद केले आहेत. राशीद खान आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतो. त्याव्यतिरिक्त राशीद पीएसएल, सीपीएल आणि बीबीएल ह्या व्यावसायिक लीग स्पर्धासुद्धा खेळतो.
महत्त्वाच्या बातम्या –
‘क्या गुंडा बनेगा रे तू?’, लॉर्डस कसोटी ड्रॉ करणार्या इंग्लंडची जाफरने उडवली खिल्ली
असे तीन खेळाडू, ज्यांच्याबद्दल म्हटले जाते की त्यांना वडिलांमुळे मिळाले होते टीम इंडियात स्थान
वाढदिवस विशेष : आपल्या अचाट वेगाने प्रतिस्पर्धी फलंदाजांना धडकी भरवणारा शेन बॉन्ड