पाकिस्तान विरुद्ध झिंबाब्वे संघातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) रावळपिंडीच्या मैदनावर या मालिकेतील पहिला सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानने झिंबाब्वेला २६ धावांनी नमवले. दरम्यान मैदानावर फलंदाजी करत असलेले पाकिस्तानचे दोन फलंदाज खेळपट्टीच्या एकाच बाजूला धाव घेण्यासाठी पळाल्याची गमतीशीर घटना घडली. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्या दोन्ही फलंदाजाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
झाले असे की, नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी निवडली. त्यानंतर हळूवार सुरुवात करत १८व्या षटकापर्यंत त्यांची धावसंख्या २ बाद ८९ धावा इतकी झाली. त्यानंतर सलामीवीर फलंदाज इमाम-उल-हक आणि हॅरिस सोहेल हे एका बाजूने संघाचा डाव पुढे नेत होते.
अशात डावातील २६वे षटक टाकण्यासाठी झिंब्वावेचा गोलंदाज सिकंदर राझा आला. त्याच्या षटकातील पाचव्या चेंडूवर इमाम-उल-हकने साधारण शॉट मारला. त्यामुळे नॉन-स्टाईकर बाजूला असलेला हॅरिस सोहेल एक धाव घेण्यासाठी पळाला. मात्र इंजमाम-उल-हक आपण मारलेल्या चेंडूकडे पाहत हळूवार धावत होता. तेवढ्यात क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडल्याचे पाहिल्यानंतर त्याने माघारी क्रीजकडे धाव घेतली.
परंतु तोवर नॉन स्ट्राइकर बाजूला असलेला सोहेल वेगाने धावत स्ट्राईकर बाजूला पोहोचला होता. त्यामुळे झिंब्वावेच्या विस्ली माधवर आणि सिंकदर राझाच्या हातून इंजमाम-उल-हक धावबाद झाला.
https://twitter.com/sandybatsman/status/1322105964108021761?s=20
https://twitter.com/AbhishekEditz/status/1322113252382318593?s=20
त्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मात्र त्यांना धारेवर धरले. त्यामुळे त्यांचे धावबाद होण्याचे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या व्हायरल होत आहे. एका वापरकर्त्याने तर ट्विटरवर इमाम-उल-हक आणि हॅरिस सोहेलचा खेळपट्टीच्या एकाच बाजूला धावतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला मजेशीर कॅप्शन देत त्याने लिहिले आहे की, ‘खेळपट्टीच्या आत धाव घेण्याची पाकिस्तानची स्टाइल.’
महत्त्वाच्या बातम्या-
एकेवेळी करणार होता आत्महत्या; आता करणार भारतीय फलंदाजांच्या दांड्या गुल
धोनी पुन्हा फॉर्ममध्ये आणण्याचा फॉर्मुला सापडला, श्रीलंकन दिग्गजाने सुचवला मोठा उपाय
लॉकडाऊनमध्ये पत्नीसोबत केला टेरेसवर फलंदाजीचा सराव, आता आयपीएलमध्ये धुतोय गोलंदाजांना
ट्रेंडिंग लेख-
CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला
IPL 2020 – धोनीच्या ‘या’ पाच पठ्ठ्यांनी कोलकाताच्या सेनेला दाखवले आस्मान