आयपीएल २०२० मध्ये गुरुवारी(२९ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना झाला. या सामन्यात चेन्नईने ६ विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईच्या या विजयात अर्धशतकी खेळी करत ऋतुराज गायकवाडने तर अखेरच्या २ षटकात आक्रमक खेळी करणाऱ्या रविंद्र जडेजाने मोलाचा वाटा उचलला. ऋतुराज या सामन्याचा सामनावीर ठरला. याबरोबरच त्याने या सामन्यात खास विक्रमही केला.
कोलकाताने चेन्नईला विजयासाठी १७३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऋतुराजने ५३ चेंडूत ७२ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याच्या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी जडेजाने खांद्यावर घेत आक्रमक खेळ केला. चेन्नईला शेवटच्या २ चेंडूंवर ७ धावांची गरज असताना त्याने सलग २ षटकार मारत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी कोलकाताकडून नितीश राणाने चमकदार कामगिरी केली. त्याने ६१ चेंडूत ८७ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत १० चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.
या सामन्यादरम्यान झालेल्या काही खास विक्रमांवर नजर टाकू –
#आयपीएल २०२०मध्ये सलग दोन सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकणारे खेळाडू
संजू सॅमसन
केएल राहुल
शिखर धवन
क्विंटन डी कॉक
ऋतुराज गायकवाड
#सामना जिंकून देताना केकेआरविरुद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार मारणारे क्रिकेटर
रोहित शर्मा, डेक्कन चार्जर्स, २००९
अंबाती रायुडू, मुंबई इंडियन्स, २०११
ड्वेन ब्राव्हो, चेन्नई सुपर किंग्ज, २०१२
रविंद्र जडेजा, चेन्नई सुपर किंग्ज, २०२०
#सर्वाधिक वेळा शेवटच्या चेंडूवर धावांचा पाठलाग करताना सामने जिंकणारे संघ
६- चेन्नई सुपर किंग्ज
५- मुंबई इंडियन्स
४- राजस्थान रॉयल्स
३- किंग्ज इलेव्हन पंजाब
२- दिल्ली कॅपिटल्स
१- केकेआर, आरसीबी, एसआरच, डेक्कन, पुण, गुजरात
#अनकॅप्ड खेळाडूने सीएसकेकडून केलेल्या सर्वाधिक धावा
७२- ऋतुराज गायकवाड विरुद्ध केकेआर, २०२०
नाबद ६५- ऋतुराज गायकवाड विरुद्ध आरसीबी, २०२०
६४- एस बद्रिनाथ विरुद्ध पंजाब, २००८
६४- अनिरुद्ध श्रीकांत विरुद्ध केकेआर, २०११
#०७ ऑक्टोबर- सीएसके विरुद्ध केकेआर, धोनी त्रिफळाचीत गोलंदाज वरुण चक्रवर्ती
२९ ऑक्टोबर- सीएसके विरुद्ध केकेआर, धोनी त्रिफळाचीत गोलंदाज वरुण चक्रवर्ती
महत्त्वाच्या बातम्या –
‘पुढच्या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा करू शकतो का?’ या प्रश्नावर मॅक्सवेलने दिलं भन्नाट उत्तर
कोलकाता विरुद्ध चेन्नईच्या विजयाने मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित, कसे ते वाचा
जडेजाने ठोकला शेवटच्या चेंडूवर षटकार आणि सीएसकेने रचला इतिहास
ट्रेंडिंग लेख –
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…
भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला