आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 49 वा सामना चेन्नई सूपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या अटीतटीच्या सामन्यात चेन्नईने डावाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. या पराभवानंतर कोलकाताला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे अतिशय अवघड झाले आहे. मात्र, मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ ठरला आहे.
कोलकाताने चेन्नईला दिले 173 धावांचे लक्ष्य
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत 5 बाद 172 धावा केल्या. सलामीवीर नितीश राणाने 61 चेंडूत 87 धावांची उत्कृष्ट खेळी केली.त्याने या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार लगावले. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर अधिक काळ टिकता आले नाही.
चेन्नईने मिळवला विजय
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 72 धावांची खेळी करून चेन्नईच्या विजयात मोलाचे योगदान दिले. मात्र,रवींद्र जडेजाने आपल्या फटकेबाजीने सर्वांनाच प्रभावित केले. विजयासाठी शेवटच्या 2 चेंडूवर 7 धावांची गरज होती.जडेजाने दोन्ही चेंडूवर 2 षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
मुंबई ठरला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ
गुणतालिकेतील अव्वल चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतात. मुंबई इंडियन्स गुणतालिकेत 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. मुंबईचा नेट रनरेटही चांगला आहे. त्यामुळे मुंबई प्ले ऑफसाठी पात्र होणारा पहिला संघ ठरला आहे. कारण आता केवळ 4 संघांनाच 16 गुण मिळवण्याची संधी आहे आणि मुंबईने आधीच 16 गुण मिळवले आहेत. तर चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी कोलकातालाही 16 गुण मिळवण्याची संधी होती. मात्र त्यांचा चेन्नईकडून पराभव झाल्याने आता ते जास्तीत जास्त 14 गुण मिळवू शकतात. कारण त्यांचे आता केवळ 1 सामना बाकी आहे.
#MumbaiIndians qualifies for the playoffs after Match 49 of #Dream11IPL pic.twitter.com/50w5mOZA7y
— IndianPremierLeague (@IPL) October 29, 2020
कोलकाताला रनरेट वाढवण्यासाठी करावी लागेल मेहनत
कोलकाताचा या हंगामातील 13 सामन्यातील हा 7 वा पराभव होता. हा संघ गुणतालिकेत 5 व्या स्थानी आहे. कोलकाताचा फक्त एकच सामना शिल्लक आहे. त्यांना राजस्थान रॉयल्सविरुद्ध रविवारी (1 नोव्हेंबर) सामना खेळायचा आहे. केकेआरने तो सामना जिंकला, तरीही त्यांचे 14 गुण होतील आणि अशा परिस्थितीत प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याचा निर्णय रनरेटवर अवलंबून असेल. एवढेच नाही तर अन्य संघांच्या निकालांवरही त्यांना अवलंबून राहावे लागेल. तसेच कोलकाताला रनरेट सुधारण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
जडेजाने ठोकला शेवटच्या चेंडूवर षटकार आणि सीएसकेने रचला इतिहास
Video : मिस्ट्री स्पिनरच्या जाळ्यात अडकला धोनी; हंगामात दुसऱ्यांदा झाला बोल्ड
Video : ‘त्यांना भेटायला उत्सुक आहे’ अँजिओप्लास्टी झाल्यानंतर कपिल देव यांनी व्यक्त केली इच्छा
ट्रेंडिंग लेख –
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…
भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला






