ऑस्ट्रेलियाने भारताची डोकेदुखी वाढवली आहे, कारण आयसीसी कसोटी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने आणखी एक विजय मिळवला आहे. ज्यामुळे भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा 164 धावांनी पराभव केला आहे. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या कसोटी चॅम्पियनशीपमध्ये विजयी टक्केवारी 70च्या पुढे गेली आहे, तर भारताची टक्केवारी 52च्या आसपास आहे.
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यामुळे त्यांची कसोटी चॅम्पियनशीपमध्ये विजयी टक्केवारी 72.73 झाली आहे, तर वेस्ट इंडिजची टक्केवारी 45 झाली. भारत 52.08 टक्केवारीने चौथ्या स्थानावर आहे. पहिले स्थान ऑस्ट्रेलियाने पटकावले आहे.
भारताला बांगलादेश दौऱ्यात दोन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर चार कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या सहाही सामन्यातील एकही सामना भारताने गमावला तर भारताच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या संधी कमी होतील. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेस्ट इंडिज जिंकला असता, तर भारताला फायदा झाला असता, कारण ऑस्ट्रेलियाची टक्केवारी कमी झाली असती मात्र असे झाले नाही.
सध्या कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या, श्रीलंका तिसऱ्या, भारत चौथ्या, पाकिस्तान पाचव्या, वेस्ट इंडिज सहाव्या, इंग्लंड सातव्या, न्यूझीलंड आठव्या आणि बांगलादेश नवव्या स्थानावर आहे.
Australia win 🎉
Nathan Lyon sends West Indies packing with a match-winning six-for 🔥
Watch the #AUSvWI series live on https://t.co/CPDKNxpgZ3 (in select regions) 📺#WTC23 | Scorecard: https://t.co/YyderoqpP2 pic.twitter.com/3Il9j6hBNL
— ICC (@ICC) December 4, 2022
वेस्ट इंडिजविरुद्ध ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschagne) यांनी द्विशतके केल्याने संघाने 4 विकेट्स गमावत 598 धावसंख्या उभारली होती. वेस्ट इंडिजचा पहिला डाव 283 धावसंख्येवरच आटोपला. तसेच ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात पुन्हा एकदा लॅब्यूशेनने शतकी खेळी केली. यामुळे त्यांनी वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी 498 धावांचे लक्ष दिले होते आणि वेस्ट इंडिज 333 धावसंख्येवरच गारद झाला. लॅब्युशेन सामनावीर ठरला.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा सामना 8 डिसेंबरला ऍडलेड येथे खेळला जाणार आहे. Australia beat West Indies in First Test & Stayed Top in WTC Points Table
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीपाठोपाठ रिषभ पंतही वनडे मालिकेतून बाहेर, खुद्द बीसीसीआयने सांगितले कारण
भारतीय क्रिकेटला बदनाम करणारे माईक डेनिस: ज्यांनी केलेली अर्धी टीम इंडिया बॅन